साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग भारतात लवकरच आपल्या एम सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन्स सादर करू शकते, जयबद्दल बातम्या येत आहेत. या नवीन सीरीज मध्ये गॅलेक्सी एम10, गॅलेक्सी एम20 आणि गॅलेक्सी एम30 स्मार्टफोन लॉन्च करेल. 91मोबाईल्स ने या फोन्स बद्दल अनेक खुलासे केले आहेत. सर्वात आधी आम्ही माहिती दिली होती कि या फोनचे प्रोडक्शन सॅमसंगच्या नोयडा मधील फॅक्ट्री मध्ये होत आहे. तसेच नुकताच गॅलेक्सी एम10 सॅमसंगच्या सपोर्ट पेज वर स्पॉट केला गेला होता, आत गॅलेक्सी एम20 सॅमसंग सपोर्ट पेज वर लाइव झाला आहे, जमुळे अशा आहे कि हा फोन पण गॅलेक्सी एम10 सोबत सादर केला जाऊ शकतो.
हा सपोर्ट पेज सर्वात आधी मायस्मार्ट प्राईस ने स्पॉट केला होता. या सपोर्ट पेज मध्ये डिवाइसबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या पेज वरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एम10 प्रमाणे एम20 पण लवकरच सादर करण्याची योजना बनवत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम20 बद्दल बोलले जात आहे कि हा मिड-टेबल वेरिएंट असेल जो एंट्री-सेगमेंट पोर्टफोलियो मध्ये 15,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो. अशा आहे कि यात 6.13-इंच इनफिनिटी-वी डिस्प्ले वाटरड्रॉप नॉच सह असेल. तसेच यात 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो असेल. नुकताच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी एम20 चा लाइव फोटो एक्सक्लूसिवली दाखवला होता.
नुकत्याच आलेल्या गॅलेक्सी एम20 च्या लाइव इमेज वरून डिवाइसच्या डिजाइनची माहिती समोर आली होती. ज्यावरून समजले होते कि डिवाइस मध्ये वॉटर ड्रॉप नॉच असेल. पण सॅमसंग याला नॉच नव्हे तर इनफिनिटी कट म्हणते. गॅलेक्सी एम20 मध्ये बेजल्स खूप कमी असतील.
आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार गॅलेक्सी एम20 मध्ये 6.13-इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच काही दिवसांपूर्वी हा फोन ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला होता. आशा आहे कि डिवाइस एक्सनोस 7904 चिपसेट आधारित असेल. सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी व 64जीबी चे दोन स्टोरेज वेरियंट असू शकतात. माहितीनुसार डिवाइस मध्ये 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंटला कंपनी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देऊ शकते.
याव्यतिरिक्त आम्हाला एम सीरीज मधील सॅमसंग गॅलेक्सी ए10 ची पण काही माहिती मिळाली आहे, जयनुसार डिवाइस 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच गॅलेक्सी एम20 कंपनी 15,000 पेक्षा कमी बजेट मध्ये आणण्याचा प्लान करत आहे.















