Airtel, Jio आणि Vi चे ग्राहक 3 जुलैपूर्वी करा हे रिचार्ज, होईल मोठी बचत!

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवून वापरकर्त्यांची काळजी वाढवली आहे. तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनच्या वाढलेल्या किमती जुलै महिन्यापासून लागू केल्या जातील, त्यानंतर यूजर्स चिंतेत पडले आहेत, कारण कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. ही बातमी आल्यानंतर लोकांमध्ये काळजीचे वातावरण आहे. जर तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर आम्ही तुम्हाला तिन्ही कंपन्यांच्या एक वर्षाच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. पण अट अशी आहे की, तुम्हाला हे रिचार्ज 3 जुलैपूर्वी करावे लागतील.

Jio चे एक वर्ष चालणारे रिचार्ज

जुनी किंमत फायदे वैधता नवीन किंमत
2,999 रुपये 2.5 GB/day, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज  365 दिवस 3,599 रुपये
1,559 रुपये एकूण 24 जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 336 दिवस 1,899 रुपये

 

1. Jio चा 2,999 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि जिओ ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन आणि दररोज 2.5GB डेटा देखील मिळतो. तथापि 3 जुलैनंतर प्लॅनची किंमत 600 रुपयांनी वाढेल. म्हणजेच ती 3,599 रुपये इतकी होईल.

2. Jio चा 1,559 रुपयांचा प्लॅन: हा एक दीर्घकाळ चालणारा प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये यूजर्सना 336 दिवसांची वैधता मिळते. या वैधतेदरम्यान, वापरकर्त्यांना एकूण 24GB डेटा मिळतो. या रिचार्जमध्ये डेटा आणि वैधतेशिवाय अमर्यादित कॉलिंगचाही फायदा मिळतो. त्याच वेळी या प्लॅनची किंमत 3 जुलैनंतर 1,899 रुपये होईल.

Airtel चे एक वर्ष चालणारे रिचार्ज

जुनी किंमत फायदे वैधता नवीन किंमत
2,999 रुपये 2 GB/day, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज  365 दिवस 3,599 रुपये
1,799 रुपये एकूण 24 जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 365 दिवस 1,999 रुपये

 

1. एअरटेलचा 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: हा प्रीपेड प्लॅन 1 वर्षासाठी असून, यात दररोज 2GB डेटा, मोफत व्हॉईस कॉल्स, प्रतिदिन 100 एसएमएस सह, विंक म्यूजिक, अपोलो 24×7 सर्कलची सेवा मिळते. तसेच या रिचार्जमध्ये फास्टॅग कॅशबॅक आणि मोफत हॅलो ट्यून्स सारखा इतर मोफत लाभ मिळतो. प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. त्याचवेळी, हा रिचार्ज 3 जुलैनंतर 3,599 रुपयांना होईल.

2. एअरटेलचा 1,799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: एअरटेलच्या दीर्घकालीन रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल, 3,600 एसएमएस आणि 24GB डेटा उपलब्ध आहे. या रिचार्जमध्ये अतिरिक्त लाभ म्हणून विंक म्यूजिकचे मोफत सबस्क्रिप्शन, मोफत हॅलो ट्यून्स, अपोलो 24×7 सर्कल आणि फास्टॅग वर 150 रुपयांच्या कॅशबॅकचा समावेश आहे.

Vi चे एक वर्ष चालणारे रिचार्ज

जुनी किंमत फायदे वैधता नवीन किंमत
2,899 रुपये 1.5 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाईट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 365 दिन 3,499 रुपये
1,799 रुपये 24 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS 365 दिवस 1,999 रुपये

 

1. Vi चा 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: या प्रीपेड प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी दररोज 1.5GB डेटा, मोफत व्हॉईस कॉल्स, 100 एसएमएस वापरण्यासाठी मिळतात. प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. त्याचवेळी 3 जुलैनंतर हा रिचार्ज 3,499 रुपयांना होईल.

2. Vi चा 1,799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: Vi चा दीर्घकालीन रिचार्ज प्लॅन 365 दिवसांची वैधता देतो. याशिवाय रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल, 3,600 एसएमएस आणि 24GB डेटा उपलब्ध आहे.

पाहिले तर दीर्घ वैधतेसह 2,999 रुपयांना असणारा रिचार्ज प्लॅन जिओचा सर्वात परवडणारा आणि अनेक फायद्यांसह येतो. त्याचवेळी 3 जुलैनंतर किंमत वाढल्या तरीही तो परवडणारा राहील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here