Redmi 9 आणि Xiaomi Mi 10 सीरीज पुढल्या महिन्यात होतील भारतात लॉन्च, महत्वाच्या माहितीचा खुलासा

Xiaomi ने अलीकडेच आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन हाईएंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत ज्यांनी फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआईएस वर लिस्ट झाले होते, ज्यामुळे आशा वाढली होती कि मी 10 आणि मी 10 प्रो लवकरच इंंडियन मार्केट मध्ये पण येतील. आता 91मोबाईल्सला Xiaomi Mi 10 व Mi 10 Pro च्या लॉन्चची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर आम्हाला समजले आहे कि मी सीरीजच्या व्यतिरिक्त कंपनी रेडमी सीरीज मध्ये पण नवीन स्मार्टफोन Redmi 9 पण आणणार आहे.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि शाओमी Mi 10 व Mi 10 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही स्मार्टफोन मार्च महिन्याच्या मध्यंतरी म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारात लॉन्च केले जातील. शाओमी या हाईएंड स्मार्टफोन्सचा लॉन्च ईवेंट आयोजित करून मार्केट मध्ये आणेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी ईवेंट मध्ये मी 10 व मी 10 प्रो सोबत Xiaomi रेडमी सीरीज मध्ये पण नवीन फोन आणेल जो Redmi 9 नावाने लॉन्च केला जाईल. Mi 10 आणि Mi 10 Pro फ्लॅगशिप फोन असतील तर Redmi 9 लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

Xiaomi Mi 10

शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

Xiaomi Mi 10 Pro

शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.

Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Redmi 9

हा स्मार्टफोन लो बजेट डिवाईस असेल आणि रेडमी 9 बद्दल चर्चा आहे कि शाओमी हा मीडियाटेक जी70 चिपसेट वर लॉन्च करेल. हा चिपसेट आपण Realme C3 मध्ये बघितला होता. स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची एचडी+ पिक्सल रेजल्यूशन असलेली स्क्रीन मिळेल. Redmi 9 वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च केला जाईल. राहिला प्रश्न मेमरीचा तर आता पर्यंत आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार Redmi 9 च्या एका वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मेमरी दिली जाईल आणि हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. आशा आहे कि हा फोन Xiaomi मोठ्या बॅटरी सह बाजारात सादर करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here