फक्त 6,399 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळत आहेत हे स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फ्लिपकार्ट फ्लॅगशिप सेल ऑफर

तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट फ्लॅगशिप सेल सुरू होत आहे. यामध्ये अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर आपण स्मार्ट टीव्हीबद्दल बोललो तर Thomson कंपनी आपले अनेक मॉडेल अतिशय स्वस्त दरात विकत आहे. विशेष बाब म्हणजे सुरुवातीचे मॉडेल केवळ 6,399 रुपयांना उपलब्ध आहे. एवढेच नाही तर बँक डिस्काऊंट आणि कॅशबॅकचाही फायदा मिळेल. चला, या टीव्ही डीलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Thomson Smart TV च्या ऑफरचा तपशील

  • ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या फ्लॅगशिप सेल दरम्यान थॉमसनच्या स्मार्ट टीव्हीवर आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, येस बँक कार्ड्सद्वारे टीव्ही खरेदी करण्यावर 10 टक्क्यांची झटपट सूट दिली जात आहे.
  • जर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डधारक असाल तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. सेल दरम्यान 24 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 6,399 रुपये किमतीत मिळेल.
  • तर 32 इंचाचा टीव्ही फक्त 8,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. थॉमसनचा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही मॉडेल तुम्हाला फक्त 17,999 रुपयांमध्ये मिळेल.
  • त्याचप्रमाणे थॉमसन टीव्हीच्या संपूर्ण श्रेणीवर सवलत ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये 24 इंच ते 65 इंचापर्यंतच्या मॉडेल्सचा समावेश आहे.
  • तुम्ही खालील फोटो टेबलमध्ये सर्व स्मार्ट टीव्हीची किंमत तपशील पाहू शकता.

Thomson Smart TV चे फिचर्स

रिअलटेक प्रोसेसर असलेले थॉमसन एफए टीव्ही मध्ये अँड्रॉईड 11 सह प्रीमियम फिचर्स सारखे बेझल-लेस डिझाईन, 30 वॅट स्पीकर, डॉल्बी डिजिटल, बिल्ड इन नेटफ्लिक्स, 6,000 हून अधिक ॲप्स आणि गेम्स, प्राईम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, ॲपल टीव्ही, वूट, झी5, सोनी लिव्ह, 500,000 टीव्ही शो सोबत गुगल प्ले स्टोअरची सुविधा देण्यात आली आहे.

4k डिस्प्ले असलेले थॉमसन गुगल टीव्ही बेझल-लेस आहे आणि डॉल्बी व्हिजन HDR 10+, डॉल्बी ॲटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराऊंड, 40 वॉट डॉल्बी ऑडिओ स्टिरीओ बॉक्स स्पीकर, 2 जीबी रॅम, 16 जीबी रॉम, ड्युअल बँड (2.4+5) गीगाहर्ट्झ वाय-फायला सपोर्ट करतो.

थॉमसनची अँड्रॉईड टीव्ही सीरीज अल्ट्रा-हाय डेफिनेशन रिझोल्यूशन आणि HDR10+ सह येत आहे. यामध्ये 40W चे साऊंड आउटपुट आणि डॉल्बी MS 12, डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रूसराऊंड चा सपोर्ट आहे. हे सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी MEMC तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. टीव्ही ANDROID 10 वर चालतात. यात इन-बिल्ट क्रॉमकास्ट आहे आणि ते एयरप्ले ला देखील सपोर्ट करते. याशिवाय टीव्हीच्या रिमोट मध्ये व्हॉईस सर्च, नेटफ्लिक्स, यूट्यूब, गुगल प्लेसाठी गुगल असिस्टंट शॉर्टकट मिळेल.

थॉमसनचे QLED टीव्ही पूर्णपणे फ्रेमलेस आहेत. हे HDR 10+ सह डॉल्बी व्हिजन, डॉल्बी ॲटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराऊंड सपोर्ट, बेझल-लेस डिझाईन, 40W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकरने सुसज्ज आहे. यात 2GB रॅम, 16GB रॉम, ड्युअल बँड (2.4+5)GHz वाय-फाय, गुगल टीव्ही यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here