टेक्नोने जागतिक बाजारात आपल्या स्पार्क सीरीजचा Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोन गेल्या महिन्यात जूनमध्ये लाँच केला आहे. तसेच, आता याच्या भारतातील लाँचची बातमी समोर येणार आहेत. तसेच डिव्हाईसच्या भारतीय लाँचच्या आधी याचे मार्केटिंग मटेरियल दिसले आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशन, कलर आणि लूकची माहिती मिळाली आहे. चला, पुढे मोबाईलच्या ताजे अपडेट सविस्तर जाणून घेऊया.
Tecno Spark 20 Pro 5G मार्केटिंग मटेरियल (लीक)
- Tecno Spark 20 Pro 5G बद्दल टेकआऊटलुक वेबसाइटने माहिती शेअर केली आहे. परंतु यात लाँचची तारीख आली नाही, मात्र आशा आहे की हा लवकर एंट्री घेऊ शकतो.
- तुम्ही खाली दिलेल्या मार्केटिंग मटेरिअल फोटोमध्ये पाहू शकता की टेक्नो स्पार्क 20 प्रो 5 जी मध्ये 108 मेगापिक्सल अल्ट्रा क्लिअर कॅमेरा मिळण्याची चर्चा आहे.
- डिव्हाईसमध्ये व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह 16GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
- लीक टिझर पोस्टरमध्ये हे पण लिहिले आहे की मोबाईल फोन 5G चा चॅम्पियन असेल.
- कलर ऑप्शन पाहता मार्केटिंग मटेरिअल लीकमध्ये Tecno Spark 20 Pro 5G दोन कलरमध्ये दिसून आला आहे. जो काळा आणि पांढरा आहे.
Tecno Spark 20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन (ग्लोबल)
हा मोबाईल ग्लोबली जूनमध्ये सादर झाला आहे. ज्याचे स्पेक्स तुम्ही पुढे पाहू शकता.
- डिस्प्ले: Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल कटआईट डिझाईन देण्यात आली आहे.
- चिपसेट: मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 6080 5G प्रोसेसर लावला आहे.
- स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह 8 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. ज्याच्या मदतीने 16 जीबी पर्यंतचा पावर उपयोग केला जाऊ शकतो.
- कॅमेरा: मोबाईलच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा अल्ट्रा-सेंसिंग मेन कॅमेरा आहे ज्यात 3x लॉसलेस इन सेन्सर झूम आणि 10x डिजिटल झूम मिळतो. त्याचबरोबर 2MP चा इतर मॅक्रो सेन्सर आहे. तसेच, सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा लावला आहे.
- बॅटरी: फोनमध्ये 5000mAh ची मोठ बॅटरी देण्यात आली आहे. याला चार्ज करण्यासाठी 33W चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
- ओएस: हा फोन अँड्रॉईड 14 आधारित टेक्नोच्या HiOS 14 सह मिळून चालतो.















