
Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.
Vi चे 17 रुपये आणि 57 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्स
Vi Rs 17 प्लॅन :
- ह्या नवीन 17 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24 तासांची वैधता मिळते, ज्यात अनलिमिटेड नाइट डेटा (12 AM आणि 6 AM दरम्यान) मिळतो.
- परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही आउटगोइंग एसएमएस आणि सर्व्हिस वैधता मिळत नाहीत.
Vi Rs 57 प्लॅन :
- Rs 57 प्रीपेड प्लॅनची वैधता 7 दिवस आहे.
- ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळतो. परंतु ह्यात सर्व्हिस वैधता आणि आउटगोइंग एसएमएसचा फायदा मिळत नाही.
Vi का 1,999 रुपयांचा प्लॅन
- ह्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
- रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस प्रति दिन आणि 1.5जीबी डेली डेटा मिळतो.
- हाय-स्पीड डेटा संपल्यावर ग्राहकांना 64Kbps स्पीडवर इंटरनेट वापरता येते.
- तसेच 100 एसएमएस संपल्यावर युजर्सना लोकल मेसेजसाठी 1 रुपये आणि एसटीडी मेसेजसाठी 1.50 पैसे चार्ज केले जातील.
तसेच कंपनीनं अलीकडेच लाँच केलेल्या 549 रुपयांचा प्लॅन आपल्या साइटवरून हटवला आहे. ह्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता आणि 1GB डेटाचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये 549 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळत होता. ह्या टॉकटाइमच्या मदतीनं ग्राहक 2.5 पैसे प्रति सेकंदच्या हिशोबाने वर कॉल करू शकतात.














