Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम

Highlights

  • Snapdragon 685 चिपसेट असलेला पहिला फोन भारतात.
  • 6GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • Redmi Note 12 4G फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो


आज शाओमीनं भारतात Redmi Note 12 Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आणलेला Redmi Note 12 4G देशात सादर केला आहे. कंपनीनं Redmi Note 12 4G स्मार्टफोन फक्त 14,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 685 चिपसेट, 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 4G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 FHD+ Super AMOLED 120Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 685
  • 50MP+8MP+2MP Camera
  • 33W 5,000mAh Battery

रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा एक सुपर अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1200निट्स पिक ब्राइटनेस, DCI-P3 कलर गेमुट आणि 4,500:000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो. हे देखील वाचा: Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही

Redmi Note 12 4G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 4जी 6GB LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंत UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. यात वर्च्युअली 5GB अतिरिक्त रॅम पवार मिळवता येईल. तसेच यातील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येईल.

रेडमी नोट 12 4जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 30 दिवस वैधता आणि 30जीबी डेटासह आला Vi चा नवीन प्लॅन

Redmi Note 12 4G ड्युअल सिम फोन आहे. हा फोन आयपी53 रेटेड आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटर प्रूफ बनतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी यह रेडमी नोट 12 4जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

Redmi Note 12 4G ची किंमत

Redmi Note 12 4G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. तर फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. रेडमी नोट 12 ची विक्री 6 एप्रिलपासून सुरु होईल तसेच फोन Sunrise Gold, Lunar Black आणि Ice Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here