Infinix चा नवा लॅपटॉप Zero Book Ultra AI PC भारतीय बाजारात लाँच झाला आहे. हा डिव्हाईस ग्राहकांना तीन व्हेरिएंटमध्ये विकला जात आहे. त्याची विक्री आजपासून म्हणजेच 10 जुलै 2024 पासून ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. हे विशेषतः तंत्रज्ञानप्रेमी आणि व्यावसायिकांना लक्षात घेऊन लाँच करण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अत्याधुनिक AI क्षमता आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सचा अनुभव मिळेल. चला, पुढे नवीन लॅपटॉपची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Infinix Zero Book Ultra AI PC चे स्पेसिफिकेशन
- 15.6 (1920 x 1080) इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
- इंटेल कोअर अल्ट्रा (अल्ट्रा 5/7/9) चिप
- 32 जीबी LPDDR 5x रॅम, 1 टीबी PCIe 4.0 SSD
- 100 वॅट पॉवर अडॅप्टर
- AI-powered BeautyCam
- ड्युअल मायक्रोफोन
- वाय-फाय 6E
डिस्प्ले: लॅपटॉपच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास यात 400 निट्स पर्यंतची पीक ब्राईटनेस असलेला 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळत आहे. जो 100 टक्के sRGB कलर गॅमट कव्हरेज देईल.
प्रोसेसिंग: Zero Book Ultra AI PC लॅपटॉप Intel च्या Core Ultra प्रोसेसरद्वारे ऑपरेट करतो. या प्रोसेसरमध्ये इंटिग्रेटेड न्यूरल प्रोसेसिंग युनिट (NPU) आहे, जे त्याच्या 70% कार्यक्षमतेसह जलद AI जनरेटिव्ह टास्क परफॉर्मन्स देते. यात इंटेल एआरसी जीपीयू, एक्सई एसएस फ्रेम एक्सीलरेशन, रे ट्रेसिंग आणि मीडिया इंजिन, हायब्रिड आर्किटेक्चर सीपीयू, एनपीयू आणि जीपीयू मिळत आहे. जो विलक्षण 3D परफॉर्मन्स आणि AI क्षमता प्रदान करतो. हे मॉडेल Windows 11 च्या को-पायलट फीचरला सपोर्ट करते. या टॉप मॉडेलच्या Intel Core Ultra 9 मध्ये 16 कोरचा शक्तिशाली आर्किटेक्चर दिला गेला आहे. यात 6 हाय-परफॉर्मन्स कोर आहेत, 8 रेगूलर कोर, आणि 2 लो-पॉवर कोर समाविष्ट आहेत.
स्टोरेज: नवीन Infinix लॅपटॉप 32GB पर्यंत LPDDR 5x रॅम आणि 1TB पर्यंत SSD इंटरनल स्टोरेजसह येतात. जो जलद डेटा ट्रान्सफर आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे.
AI तंत्रज्ञान: देशातील AI PC ची वाढती मागणी लक्षात घेऊन, या लॅपटॉपला जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षमता आणि इंटेल AI बूस्टर तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले आहे.
डिझाईन आणि कूलिंग सिस्टम: लॅपटॉपची रचना अतिशय आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे. यात 79 पातळ शार्क ब्लेड आणि उष्णता शोषण्यासाठी दोन शक्तिशाली पंखे असलेली प्रगत आईस स्टॉर्म ड्युअल फॅन कूलिंग सिस्टम बसवण्यात आली आहे.
इतर फिचर्स: लॅपटॉपमध्ये AI-चालित ब्युटी कॅम, इमर्सिव्ह साउंडसाठी क्वाड-ॲरे ऑडिओ सिस्टम, WiFi 6E आणि ब्लूटूथ 5.2 सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय दिले गेले आहेत.
Zero Book Ultra AI PC लॅपटॉपची किंमत
Infinix ने Zero Book Ultra AI PC लॅपटॉपचे तीन व्हेरिएंट्स सादर केले आहेत. यातील Ultra 5 या पहिल्या मॉडेलची किंमत 59,990 रुपये आहे. जो 16GB + 512GB, 125H सोबत येतो. तर, 16GB + 512GB, 155H सह दुसऱ्या व्हेरिएंट Ultra 7 ची किंमत 69,990 रुपये आणि 32GB + 1TB, 185H सह मिळणारा तिसरा पर्याय Ultra 9 ची किंमत 84,990 रुपये आहे.















