शाओमी घेऊन येत आहे अनोखा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला फोन, टच करताच होईल क्षणात अनलॉक

चीनच्या मोबाईल फोन निर्माता कंपनी शाओमी ने गेल्यावर्षी आपला पहिला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला मी 8 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनी ने मान्य केले आहे कि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर टेक्नॉलॉजी वेगवान नाही. शाओमीचे को-फाउंडर लीन बिन यांनी चीनच्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट वीबो वर एक वीडियो शेयर केला आहे, ज्यात नवीन जनरेशनची इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी दाखवण्यात आली आहे.

वीडियो मध्ये दाखवण्यात आलेली टेक्नोलॉजी आधीपेक्षा खूप वेगवान आणि चांगली दिसत आहे. लिन बिन नुसार, सुधारामागील पहिला पॉईंट एक टच फिंगरप्रिंट ओळखीला एनेबल करणे आहे, जी जुन्या फिंगरप्रिंट स्कॅनर पेखा वेगवान असेल. इन-डिस्प्ले स्कॅनर मधील एक महत्वपूर्ण अडचण म्हणजे टच केल्यानंतर पण फोन अनलॉक न होणे. त्यानंतर यूजर्सने वेगाने स्क्रीन वर प्रेस कर्वे लागते ज्यामुळे त्यांचा स्मार्टफोन अनलॉक होतो. या वीडियो मध्ये कंपनी आपल्या दुसऱ्या पिढीच्या इन-डिस्प्ले डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मध्ये या सर्व अडचणी दूर करताना दिसत आहे.

दुसऱ्या पॉईंट अनुसार फिंगरप्रिंट स्कॅनरचा एरिए वाढवणे आहे. लीन बिन द्वारा जारी केलेल्या वीडियो मध्ये नवीन फिंगरप्रिंट टेक्नोलॉजी एका कॉन्सेप्ट फोन वर वापरताना दाखवण्यात आली आहे जी खूप चांगली चालत आहे. पण स्मार्टफोन्स मध्ये ऑफिशियली लॉन्च झाल्यानंतर या टेक्नोलॉजी बद्दल चांगली माहिती मिळेल.

अलीकडेच शाओमी ने आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत आपला पहिला स्मार्टफोन रेडमी नोट 7 लॉन्च केला होता, जयबद्दल कंपनी ने ध्येय ठेवले आहे कि ते पहिल्या महिन्यात या डिवाइसचे 10 लाख यूनिट्स सेल करतील. रेडमी नोट 7 हॅन्डसेट ची खासियत म्हणजे हा 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर शाओमीचे सीईओ ली जून रेडमी नोट 7 मधील 18 वॉट फास्ट चार्जिंग प्रमोट करत होते, तेव्हा एका यूजर ने शाओमी मी9 बद्दल विचारले कि मी9 मध्ये 24 वॉट चार्जिंग सपोर्ट असेल का? त्याचे उत्तर देताना ली म्हणाले कि त्यापेक्षा चांगले असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here