Reliance Digital ऑनलाईन शॉपिंग साईटवर लाँचच्या आधी लिस्ट झाला हा 5G Phone, किंमत झाली लीक

91 मोबाईलने मागच्या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये खुलासा केला होता की Xiaomi सब-ब्रँड पोको भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करणार आहे तसेच नवीन स्मार्टफोन POCO M6 Plus 5G लाँच करेल. या मोबाईलची किंमत रेंज, फोटो तसेच स्पेसिफिकेशनची माहिती पण बातमी मध्ये शेअर केली आहे. तसेच आता हा पोको फोन Reliance Digital स्टोरवर लिस्ट झाला आहे जिथे किंमत आणि कलरची माहिती समोर आली आहे.

POCO M6 Plus 5G किंमत आणि कलर (लीक)

पोको एम 6 प्लस 5 जी फोन रिलायन्स डिजिटल ऑनलाईन शॉपिंग साईटवर लिस्ट झाला आहे ज्याला टिपस्टर पारस गुगलानीने स्पॉट केले आहे. बातमीमध्ये लिहिले आहे, मात्र फोनचे प्रोडक्ट पेज काढून टाकण्यात आले आहे, परंतु याच्या स्क्रीनशॉटवरून मोबाईलची किंमत आणि कलरची माहिती मिळाली आहे. येथे फोनच्या 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये सांगण्यात आली आहे. तसेच शॉपिंग साईटनुसार हा पोको फोन Lavender, Silver आणि Black कलरमध्ये विकला जाईल.

POCO M6+ 5G चा फोटो

POCO M6+ 5G स्पेसिफिकेशन

  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2
  • 8 जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • 108 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
  • 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 6.79″ 120 हर्ट्झ एलसीडी स्क्रीन
  • 33 वॉट 5,030 एमएएच बॅटरी

प्रोसेसर : 91 मोबाईलला मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाईल अँड्रॉईड 14 वर लाँच होईल तसेच हायपरओएसवर काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी POCO M6+ 5G 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो ज्याच्या सोबत 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर मिळू शकतात. तसेच मोबाईलच्या फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

डिस्प्ले : मिळालेल्या माहितीनुसार POCO M6+ 5G फोन 6.79-इंचाच्या एलसीडी डिस्प्लेवर लाँच केला जाईल. या स्क्रीनवर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळू शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी पोको एम 6+ 5 जी फोनमध्ये 5,030 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच याला फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकते.

इतर फिचर्स : लीकनुसार POCO M6+ 5G आइपी 53 रेटिंगसह येईल. यात 3.5 एमएम जॅक सह साईड मांऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here