Apple सप्टेंबरमध्ये आपली नवीन आयफोन सीरीज सादर करू शकते. अलीकडील बातम्यांनुसार, कंपनी यावेळी आयफोन 16 मॉडेल्सच्या 90 दशलक्ष युनिट्सहून अधिक शिप करण्याची योजना आखत आहे. ब्रँडला विश्वास आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत iPhone 16 ची विक्री 10 टक्क्यांनी वाढेल. पण यावेळी Apple iPhone 16 मध्ये असे काय खास असेल की तो यशाचे जुने रेकॉर्ड देखील मोडू शकेल? आगामी iPhone 16 सीरीजशी संबंधित लीक झालेले तपशील तुम्ही पुढे वाचू शकता.
Apple Intelligence
iPhone 16 सीरीज एआय फिचर्सनी सुसज्ज असेल. येथे AI चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही तर ॲपल इंटेलिजन्स आहे. काम तेच आहे फरक फक्त नावाचा आहे. नवीन ॲपल नवीन एआय तंत्रज्ञानासह येतील जे त्यांना खूप प्रगत आणि विशेष बनवेल. या संदर्भात संपूर्ण तपशील समोर आलेला नाही पण आपण अपेक्षा करू शकतो की, हा एआय फोनच्या फोटोग्राफी, एडिटिंग, यूजर इंटरफेस आणि सॉफ्टवेअर संबंधित कामांमध्ये दिसेल.

iOS 18
कंपनीने आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 18 ची घोषणा केली आहे आणि आपल्याला तीच आगामी iPhones मध्ये पाहता येणार आहे. हेच ते वैशिष्ट्य आहे ज्याबद्दल Apple ला इतका विश्वास आहे की, आयफोन 16 सीरीज 90 दशलक्षाहून अधिक डिव्हाईस विकेल. iOS 18 मध्ये प्रगत युजर इंटरफेस, उपयुक्त शॉर्टकट्स, तुम्हाला ग्राफिक्स आणि विजेट्ससह उत्तम डेटा सुरक्षा आणि गोपनीयता मिळेल.
iPhone 16 सीरीजमध्ये कोणते फोन लाँच केले जातील?
याची पुष्टी झालेली नाही पण चर्चा आहे की यावेळी आयफोन 16 सीरीजमध्ये एकूण 5 मॉडेल्स आणले जाऊ शकतात. यामध्ये व्हॅनिला मॉडेल तसेच प्लस, प्रो आणि प्रो मॅक्स यांचा समावेश असेल.
- iPhone 16
- iPhone 16 Plus
- iPhone 16 Pro
- iPhone 16 Pro Max
- iPhone 16 Plus SE/iPhone SE (2024)
आयफोन 16 सीरीजचा दर किती असेल?
iPhones त्यांच्या महागड्या किमतीसाठीही प्रसिद्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेला iPhone 15 Pro Max 1TB हा 1,99,900 रुपयांना विकला जात आहे. अशा परिस्थितीत यावेळी देखील iPhone 16 सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 2 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते. तर चर्चा आहे की iPhone 16 Pro देखील 1TB मेमरीसह लाँच केला जाऊ शकतो.
iPhone 15 ची किंमत 79,900 रुपये, iPhone 14 ची लाँच किंमत देखील 79,900 रुपये आणि iPhone 13 देखील 79,900 रुपयांना लाँच करण्यात आली होती. म्हणजे गेले तीन जनरेशन एकाच किमतीत लाँच झाले. अशा परिस्थितीत iPhone 16 हा 79,900 रुपयांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
आयफोन 16 सीरीजची डिझाईन कशी असेल?
- अशी चर्चा सुरू आहे की कंपनी iPhone 16 सीरीजसह आपली उपस्थित असलेली कॅमेऱ्याची स्टाईल बदलू शकते आणि याला व्हर्टिकल शेप असलेला रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. अशी डिझाईन आम्हाला iPhone X मध्ये पाहायला मिळाली होती.
- लीकवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या आयफोन सीरीजमध्ये फिजिकल बटणे काढून टाकली जाऊ शकतात आणि व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटणाच्या जागी टच सेन्सिटिव्ह सेन्सर दिले जाऊ शकतात.
- आणखी एक मोठा बदल आपल्याला कॅप्चर बटण याचा पाहायला मिळू शकतो. हे बटण तळाशी उजव्या बाजूला दिले जाऊ शकते जे कॅमेरा शॉर्टकट म्हणून काम करेल आणि कॅप्चर करण्यासोबतच हे झूम, फोकस इत्यादी गोष्टी देखील करेल.
- अलीकडे आलेल्या लीकनुसार iPhone 16 Pro डेझर्ट यलो (डेझर्ट टायटॅनियम) आणि सिमेंट ग्रे (टायटॅनियम ग्रे) रंगांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
iPhone 16 सीरीजमध्ये काय मिळेल?
डिस्प्ले
आयफोन 16 मध्ये डायनॅमिक आयलंड डिस्प्ले देखील दिला जाऊ शकतो. असे मानले जात आहे की यावेळी प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल आयफोन 15 पेक्षा मोठे असतील. iPhone 16 Pro मध्ये 6.27 इंचाची स्क्रीन असू शकते आणि iPhone 16 Pro Max मध्ये 6.86 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. तर iPhone 16 हा 6.1 इंचाच्या XDR डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो.
कॅमेरा
Apple iPhone 16 Pro Max ला 48 मेगापिक्सेलचा Sony IMX903 सेंसर दिला जाऊ शकतो जो एक टेलीफोटो पेरिस्कोप लेन्स असेल. या मॉडेलमध्ये दोन 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर पाहायला मिळू शकतात. त्याचवेळी iPhone 16 Pro ला 48 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स प्रदान केली जाईल, जी ProRAW फोटो कॅप्चर करेल आणि कमी लाईटमध्ये ही त्याची फोटोग्राफी उत्तम असेल. या दोन्ही मॉडेल्समध्ये 5x ऑप्टिकल झूम पासून 25x डिजिटल झूमपर्यंत पाहायला मिळू शकेल.
सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास iPhone 16 सीरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये 12 मेगापिक्सेलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो सध्याच्या आयफोन पेक्षा चांगला आणि अपग्रेड असेल.
















