पहिल्याच सेलमध्ये डिस्काउंट! 12999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G32 ची एंट्री

Motorola सध्या भारतीय बाजारात खूप सक्रिय झाली आहे. कंपनी बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमध्ये लागोपाठ जबरदस्त स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनीनं आतापर्यंत भारतात Moto G71, Moto G42, Moto G82 5G आणि इतर स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या जी सीरिजच्या स्मार्टफोनची घोषणा केली होती. त्यानुसार आज भारतात Moto G सीरीजचा नवीन स्मार्टफोन Moto G32 लाँच करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा नवीन बजेट 4G स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 6 सीरीज चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.

Moto G32 स्मार्टफोन कंपनीचा बजेट स्मार्टफोन, जो 13000 रुपयांपेक्षा कमी किंमतीती सादर करण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनची बाजारात थेट टक्कर Poco, Realme, Samsung, आणि Xiaomi च्या स्मार्टफोनशी होणार आहे. नव्याकोऱ्या Moto G32 स्मार्टफोनमध्ये 90Hz डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि Android 12 सपोर्ट देण्यात आला आहे.

Moto G32 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Moto G32 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा Full HD+ LCD स्क्रीन देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये क्वॉलकॉमची Snapdragon 680 SoC देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 वर चालतो जो स्टॉक अँड्रॉइड एक्सपीरियंस. मोटोरोलाच्या या फोनमध्ये थिंकशील्ड बिजनेस ग्रेड सिक्योरिटी मिळते.

लवकरच याला Android 13 अपडेट आणि तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. मोटोरोलाच्या या फोनचे अन्य फीचर्स पाहता फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट, IP52 वॉटर रेजिस्टन्स, साइड माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर, मोटो जेस्चर आणि स्टीरियो स्पिकर सपोर्ट मिळतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि एक डेप्थ कॅमेरा सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G32 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी 33W Turbopower फास्ट चार्जला सपोर्ट करते.

Moto G32 ची किंमत आणि उपलब्धता

Moto G32 स्मार्टफोन भारतात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा एकमेव मॉडेल 12,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं फोनचे मिनरल ग्रे आणि स्टेन सिल्व्हर कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. मोटोरोलाचा हा फोन 12 ऑगस्टला फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतर्गत HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 1250 रुपयांची सूट मिळेल. म्हणजे हा फोन फक्त 11,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जियो युजर्सना 2549 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here