टेक ब्रँड इनफिनिक्स भारतात आपल्या ‘नोट’ सीरीजचा विस्तार करणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ते येत्या 5 ऑगस्टला Infinix Note 40X 5G फोन भारतात लाँच करतील. ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर फोनचे प्रोडक्ट पेज पण शेअर करण्यात आले आहे जिथे इनफिनिक्स नोट 40 एक्स 5 जी चा फोटो व इतर माहिती पाहायला मिळाली आहे.
Infinix Note 40X 5G भारतातील लाँचची तारीख
इनफिनिक्सने आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून नोट 40 एक्स 5 जी ची लाँचची तारीख शेअर करेल. हा 5 जी फोन 5 ऑगस्टला भारतात लाँच होईल. मोबाईलची किंमत तसेच इतर स्पेसिफिकेशनची माहिती पण या दिवशी सार्वजनिक केली जाईल. इनफिनिक्स भारतीय वेबसाईट ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व युट्युब चॅनेलवर फोन लाँचची लाईव्ह माहिती पाहिली जाईल.
Infinix Note 40X 5G स्पेसिफिकेशन (कंफर्म)
कंपनीकडून सांगण्यात आले आहे की इनफिनिक्स नोट 40 एक्स 5 जी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात प्रायमरी सेन्सर 108 Megapixel चा असेल.
इनफिनिक्स नोट 40 एक्स 5 जी ला एकापेक्षा अधिक मेमरी व्हेरिएंट्समध्ये आणले जाईल. या फोनचा सर्वात मोठा मॉडेल 12GB RAM ला सपोर्ट करेल ज्याच्यासोबत 256GB Storage दिली जाईल.
हा इनिफिक्स स्मार्टफोन USB Type-C सह असेल ज्यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण मिळेल. तसेच ईअरफोन लावून गाणी ऐकण्यासाठी यात 3.5mm हेडफोन जॅक पण दिला जाईल.
Infinix Note 40X 5G स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.78″ फुलएचडी+ 120 हर्ट्स स्क्रीन
- मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसर
- 12 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी
- 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 5,000 एमएएच बॅटरी
स्क्रीन : लीक पोस्टरनुसार Infinix Note 40X 5G फोन 1080 x 2460 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या FHD+ डिस्प्लेवर लाँच होईल जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल.
प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 40 एक्स 5 जी फोनला अँड्रॉईड 14 वर सादर केले जाईल ज्याच्यासोबत XOS 14 पाहायला मिळू शकतो. लीकनुसार हा मोबाईल फोन MediaTek Dimensity 6300 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच होईल.
मेमरी : मिळालेल्या माहितीनुसार Infinix Note 40X 5G फोन 12 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लाँच होईल. फोनमध्ये वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी असेल. तसेच 12 जीबी रॅममध्ये 12 जीबी तसेच 8 जीबी रॅममध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम जोडली जाईल.
कॅमेरा : इनफिनिक्स नोट 40 एक्स 5 जी 108 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. याच्या बॅक पॅनलवर 2 एमपी सेकंडरी लेन्स तसेच थर्ड लाइट सेन्सर मिळू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8MP Selfie Camera दिला जाऊ शकतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी Infinix Note 40X 5G फोनला 5,000mAh Battery सह बाजारात आणले जाऊ शकते.
















