डुअल रियर कॅमेरा, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह भारतात लॉन्च झाला नोकिया 8.1, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही

गेल्या आठवड्यात एचएमडी ग्लोबल ने दुबई मध्ये आयोजित एक इवेंट मधून नोकिया 8.1 मॉडेल सादर केला होता. त्याचबरोबर अशी बातमी देण्यात आली होती की 10 तारखेला हा फोन भारतात लॉन्च होईल आणि आज कंपनी ने हा सादर केला आहे. भारतीय बाजारात नोकिया 8.1 ची बेस किंमत 26,999 रुपये आहे आणि हा फोन 26 डिसेंबर पासून आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया आणि ऑफलाइन स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात हा फोन नोकिया एक्स7 नावाने चीन मध्ये लॉन्च केला गेला होता पण जागतिक बाजारात हा नोकिया 8.1 नावाने उपलब्ध होईल. डुअल कॅमेरा असलेला हा फोन अनेक बाबतीती खास आहे.

नोकिया 8.1 का डिजाइन आणि डिस्प्ले
नोकिया 8.1 ची बॉडी ग्लास पासून बनलेली आहे तर साइड पॅनल मध्ये मेटल फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. फोनची क्वालिटी शानदार आहे. साइड पॅनल मध्ये डायमंड कटचा वापर करण्यात आला आहे. मागील पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि तर मध्ये डुअल कॅमेरा आहे.

हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह येतो. फोनच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हि नॉच खूप मोठी आहे. नॉच वर तुम्हाला सेल्फी कॅमेरा सह सेंसर्स पण दिसतील. फोन मध्ये 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.18-इंचाची टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे.

नोकिया 8.1 ची आॅपरेटिंग सिस्टम
नोकिया 8.1 एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर करण्यात आला आहे. चांगली बाब अशी की यात एंडरॉयडवन इंटीग्रेशन आहे. अर्थात तुम्हाला कमीत कमी दोन वर्षे एंडरॉयडचा अपडेट मिळेल. कंपनी ने लॉन्चच्या वेळी पण याची माहिती दिली आहे. कंपनी ने स्टॉक एंडरॉयड अर्थात प्योर एंडरॉयडचा वापर केला आहे त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी लेयरिंग मिळणार नाही.

नोकिया 8.1 चा प्रोसेसर आणि रॅम
हा फोन स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात आॅक्टाकोर (2.2 गीगाहट्र्ज, डुअल कोर, क्रयो 360 + 1.7गीगाहट्र्ज, हेक्सा कोर, क्रयो 360) प्रोसेसर देण्यात आला. हा दोन रॅम वेरिएंट मध्ये मिळेल. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसरा वेरिएंट 6जीबी सह 128जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता.

नोकिया 8.1 चा कॅमेरा
फोटोग्राफी साठी नोकिया 8.1 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅकला डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल + 13-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने आपल्या फोन मध्ये कार्ल जीज लेंस वापरली आहे जी चांगले फोटो घेते. तसेच ओआईएस अर्थात आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट पण आहे ज्यामुळे थोडा हात हलला तर चांगले फोटो क्लिक करता येतील. सेल्फी साठी कंपनी ने 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

कनेक्टिविटी सपोर्ट
नोकिया 8.1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

नोकिया 8.1 ची बॅटरी
पावर बॅकअप साठी नोकिया 8.1 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

कलर वेरियंट
हा फोन ब्लू सिल्वर, स्टील कॉपर आणि आयरन स्टील सहित तीन रंगांत उपलब्ध आहे.

नोकिया 8.1 ची प्राइस
नोकिया 8.1 च्या 4जीबी+64जीबी वेरियंटची प्राइस 26,999 रुपये आहे तर 6जीबी+128जीबी वेरियंटची प्राइस कंपनी ने सांगितली नाही. हा फोन जानेवारी मध्ये भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here