Oppo A60 चे जागतिक बाजारातील लाँच झाले कंफर्म, पाहा टिझरमध्ये अप्रतिम लूक

ओप्पोने आपल्या Oppo A60 स्मार्टफोनला जागतिक स्तरावर मलेशियामध्ये सादर करण्याची घोषमा केली आहे. कंपनीने आपली वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. परंतु अजून लाँचची तारीख समोर आली नाही, परंतु असे वाटत आहे की लवकरच फोन बाजारात येईल. तसेच दोन दिवसांपूर्वी 91 मोबाइलने ओप्पो ए60 आणणार असल्याची एक्सक्लूसिव्ह रिपोर्ट शेअर केली होती. जो एकदम अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. चला, पुढे टिझरमध्ये समोर आलेल्या लूक आणि स्पेसिफिकेशनवर एक नजर टाकूया.

Oppo A60 टिझर आणि डिझाईन

 • Oppo A60 स्मार्टफोनला मलेशियाच्या अधिकृत सोशल मीडिया एक्सच्या माध्यमातून समोर आणले गेले आहे.
 • स्मार्टफोनला टिझरमध्ये वेव ब्लू आणि नाईट पर्पल कलर ऑप्शनमध्ये दाखविण्यात आले आहे.
 • Oppo A60 स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला मोठा पिल शेप मॉड्यूलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश आहे.
 • फोनच्या उजव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटन पाहायले मिळत आहे तर बॅक पॅनलवर खाली ओप्पोची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
 • हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच केले गेलेल्या रेनो 11 सीरिजची आठवण करून देतो.
 • तुम्हाला सांगतो की टिझरमध्ये लाँचच्या तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही, परंतु हा डिव्हाईस लवकरच मलेशियामध्ये उपलब्ध होईल.

Oppo A60 चे स्पेसिफिकेशन

 • डायमेंशन: कंपनीच्या वेबसाईटवर समोर आलेल्या माहितीनुसार हा डिव्हाईस 7.68mm पातळ असेल.
 • डिस्प्ले: Oppo A60 मध्ये 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. यावर 950 निट्स पीक ब्राईटनेस आणि 90Hz रिफ्रेश रेट दिला जाईल.
 • प्रोसेसर: परफॉरमेंससाठी युजर्सना ब्रँड या नवीन ओप्पो फोनमध्ये Snapdragon 680 4G प्रोसेसर देईल.
 • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 8GB एक्सटेंडेड रॅम मिळण्याची माहिती मिळाली आहे. म्हणजे की एकूण मिळून युजर्सना 16GB पर्यंत रॅम पावर मिळेल. तसेच, हा फोन 8 जीबी रॅम +256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह असणार आहे.
 • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता वेबसाईटवर सांगण्यात आले आहे की Oppo A60 स्मार्टफोन 50 मेगापिक्सल अल्ट्रा क्लियर ड्युअल AI कॅमेरा असलेला ठेवला जाईल.
 • बॅटरी: वेबसाईटवर फोनच्या बॅटरीचा आकार 5000mAh आहे. त्याचबरोबर हा 45 वॉट सुपरवूक चार्जिंगसह येईल.
 • इतर: Oppo A60 मध्ये ड्युअल सिम 4 जी, वायफाय, ब्लूटूथ, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग सारखे अनेक फिचर मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here