एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया च्या प्लॅनच्या किमती वाढल्यानंतर बीएसएनएल सिमची मागणी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे बीएसएनएल मोबाईल नंबर (BSNL Mobile Number) असेल, परंतु तो काही कारणाने बंद झाला असेल, तर तुम्ही तो पुन्हा चालू करू शकता. तथापि, बंद केलेला बीएसएनएन सिम नंबर केवळ एका निश्चित काळ मर्यादेच्या आत पुन्हा चालू केला जाऊ शकतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की ट्राय (TRAI) च्या नियमांनुसार प्रीपेड मोबाईल वापरकर्त्यासाठी त्याच्या फोनमध्ये विशिष्ट बॅलन्स असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जे ग्राहक सलग 90 दिवसांपर्यंत मोबाईल नंबरचा उपयोग आउटगोईंग किंवा इनकमिंग कॉल्स, एसएमएस, डेटा किंवा व्हॉइस-व्हिडिओ कॉल्ससाठी करत नाहीत, तो नंबरही निष्क्रिय केला जातो. तथापि, ग्राहकांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी (grace period) देखील मिळतो. जर या कालावधीत सिमचा रिचार्ज केल्यास बंद केलेला बीएसएनएल क्रमांक पुन्हा चालू केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया यासाठी कोणती पद्धत आहे:
BSNL च्या बंद नंबरला असे चालू करा
जर बीएसएनएल नंबर डिस्कनेक्ट झाला असेल किंवा एक्सपायर झाला असेल, तर कंपनीच्या प्रीपेड सिम कार्डला पुन्हा सक्रिय करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, यासाठी आधी तुम्हाला सेवा बंद होण्याचे कारण शोधावे लागेल. तुमचा बीएसएनएल नंबर एक्सपायर झाला झाला असेल, कारण वैधता संपल्यानंतर तुम्ही निर्धारित मुदतीत त्याचा रिचार्ज केला नाही. जर तुमचे सिम कार्ड हरवले असेल आणि रिचार्ज केले नसेल, तर अशा परिस्थितीत खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून बीएसएनएल सिम पुन्हा सक्रिय करू शकता:
स्टेप-1: सर्वप्रथम तुम्हाला बीएसएनएल च्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय करण्याची (reactivation request) विनंती करावी लागेल.
स्टेप-2: तुम्हाला जवळच्या बीएसएनएल स्टोअरला भेट द्यावी लागेल आणि तुमची रिॲक्टिवेशन रिक्वेस्ट सबमिट करावी लागेल.
स्टेप-3: येथे रिॲक्टिवेशन रिक्वेस्टसोबत तुम्हाला तुमचा फोटो आयडी आणि ॲड्रेस प्रूफ देखील सबमिट करावा लागेल.
स्टेप-4: यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन कॉल येईल आणि तुमचा बीएसएनएल नंबर पुन्हा चालू केला जाईल.
टीप: येथे हे लक्षात घेतले पाहिजे की एकदा बीएसएनएल नंबर डिॲक्टिवेट झाल्यानंतर, ग्राहक 15 दिवसांच्या वाढीव कालावधीत तो पुन्हा सक्रिय म्हणजेच चालू करू शकतो.
दुसरीकडे, जर तुमच्या बीएसएनएल नंबरला चुकीच्या CAF मुळे ऑपरेटरने डिस्कनेक्ट केला असेल, तर तुम्ही खालील स्टेप ला फॉलो करून नंबर पुन्हा सक्रिय करू शकता:
स्टेप-1: यासाठी तुम्हाला प्रथम सीएससी (CSC) प्रभारींशी संपर्क साधावा लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर परत मिळवण्यासाठी लेखी विनंती सबमिट करावी लागेल.
स्टेप-2: यानंतर कार्यकारी तुमचा तपशील तपासेल. जर तुमचा नंबर दुसऱ्या कोणाला दिला नसेल, तर पोर्टलद्वारे आयएन बिलिंग इनचार्जला (IN Billing incharge) नंबर जारी करण्यासाठी विनंती केली जाईल.
स्टेप-3: नंतर पडताळणी प्रक्रियेनंतर तुम्हाला तोच बीएसएनएल मोबाईल नंबर जारी केला जाईल किंवा योग्य टिप्पण्यांसह तुमची विनंती नाकारली देखील जाऊ शकते.
प्रश्न-उत्तरे (FAQ)
बीएसएनएल चा ग्राहक सेवा क्रमांक काय आहे?
बीएसएनएल चा ग्राहक सेवा किंवा टोल फ्री क्रमांक 1800-180-1503 किंवा 1503 आहे.
माझे बीएसएनएल सिम सक्रिय झाले आहे की नाही हे मला कसे कळेल?
जेव्हा तुम्ही बीएसएनएलच्या लाईनवरून USSD कोड *124# डायल कराल, तेव्हा बीएसएनएल तुम्हाला बॅलेन्स आणि वैधता यांची माहिती असलेला एसएमएस पाठवेल.
मी रिचार्ज करून माझे बीएसएनएलचे सिम कसे चालू करू शकतो?
TRAI च्या नियमांनुसार, 22 मार्च 2013 पासून कोणत्याही प्रीपेड मोबाईल कनेक्शनची सेवा जर त्यांच्या खात्यातील शिल्लक 20 रुपयांपेक्षा कमी असेल किंवा 90 दिवसांपासून कोणतेही इनकमिंग किंवा आऊटगोईंग व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल, आऊटगोईंग एसएमएस, मोबाईल इंटरनेट किंवा डेटा वापर इत्यादींचा वापर केला गेला नाही, तर बंद केली जाईल. तथापि, 15 दिवसांच्या वाढीव कालावधीत 20 रुपयांच्या रिचार्जसह प्रीपेड मोबाईल कनेक्शन पुन्हा चालू केले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमचा बीएसएनएल मोबाईल निष्क्रिय झाला असेल तर तो पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमच्याकडे 15 दिवस आहेत.
बीएसएनएल चे सिम सक्रीय करण्यासाठी किती रुपयांपासून रिचार्ज करावा लागेल?
प्रीपेड मोबाईल कनेक्शन निष्क्रिय केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत 20 रुपये नाममात्र शुल्क भरून नंबरला पुन्हा सक्रिय केला जाऊ शकते.
बीएसएनएलच्या कालबाह्य झालेल्या सिमचा रिचार्ज करण्यासाठी किती खर्च येतो?
प्रीपेड प्लॅनची मुदत समाप्त झाल्यावर तुमचे खाते निष्क्रिय होते. तथापि, यानंतर तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळतो, जिथे तुम्हाला तुमच्या प्रीपेड नंबरला पुन्हा चालू करण्यासाठी तुम्हाला किमान 20 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. कृपया लक्षात घ्या की वाढीव कालावधीत तुम्ही कॉल करू शकणार नाही किंवा प्राप्त करू शकणार नाही.















