OPPO K12x 5G भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 12,999 रुपयांपासून सुरु होते. तसेच हा स्वस्त 5 जी फोन ऑनलाईन मार्केटमध्ये सादर झाला आहे तसेच दुसरीकडे 91 मोबाईलला ब्रँड च्या ‘ए’ सीरीजचे OPPO A3x 5G फोनची पण एक्सक्लूसिव्ह माहिती प्राप्त झाली आहे. सूत्रांच्या हवाल्याने आम्हाला या ओप्पो मोबाईलची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे ज्याला तुम्ही पुढे वाचू शकता.
OPPO A3x 5G ची किंमत
- 4GB RAM + 64GB Storage = ₹12,499
- 4GB RAM + 128GB Storage = ₹13,499
91 मोबाईलला रिटेल सोर्सकडून माहिती मिळाली आहे की ओप्पो कंपनी ऑफलाईन मार्केटमध्ये OPPO A3x 5G फोन आणेल. फोन स्टॉक स्टोर्सवर गेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये या मोबाईलची सेल सुरु होईल. ओप्पो ए 3 एक्स 5 जी चा 4 जीबी +64 जीबी व्हेरिएंट 12,499 रुपयांमध्ये तसेच 4 जीबी +128 जीबी व्हेरिएंट 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार हा ओप्पो मोबाईल Starry Purple, Starlight White आणि Sparkle Black कलरमध्ये विकला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय बाजारात OPPO A3x 5G ची सेल ऑगस्ट महिन्यामध्ये सुरु होईल.
OPPO A3x 5G चा फोटो
OPPO A3x 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.67″ एचडी+ 120 हर्ट्स डिस्प्ले
- मीडियाटेक डायमेंसिटी 6300
- 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमोरी
- 4 जीबी रॅम विस्तार टेक्नॉलॉजी
- 32 मेगापिक्सल कॅमेरा
- 45 वॉट फास्ट चार्जिंग
- 5,100 एमएएच बॅटरी
स्क्रीन : OPPO A3x 5G फोन 1604 x 720 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही पंच-होल स्टाईल असणारी स्क्रीन आहे जी 120 हर्ट्स रिफ्रेशवर चालते तसेच 1000 निट्स ब्राईटनेस आऊटपूट प्रदान करते.
परफॉर्मन्स : ओप्पो ए 3 एक्स 5 जी अँड्रॉईड 14 वर बनला आहे जो कलर ओएस 14.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला MediaTek Dimensity 6300 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4 गीगाहर्ट्स क्लॉक स्पीडवर चालतो.
मेमरी : OPPO A3x 5G भारतीय बाजारात 4 जीबी रॅमवर विकला जाईल. या फोनमध्ये 4 जीबी रॅम विस्तार टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे जी फिजिकल रॅमसह मिळून याला 8GB RAM ची ताकद देते. तसेच फोनमध्ये 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज मिळते.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी OPPO A3x 5G स्मार्टफोनमध्ये जबरदस्त 5,100 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 45W SuperVOOC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा टेक्नॉलॉजी फोन 10 मिनिटामध्ये 19% तसेच 75 मिनिटामध्ये फुल 100% चार्ज होऊ शकतो.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा ओप्पो मोबाईल ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 32 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
फिचर्स : मिळालेल्या माहितीनुसार ओप्पो ए 3 एक्स 5 जी मिलिट्री ग्रेड शॉक रजिटेंट स्मार्टफोन आहे. याला IP54 सर्टिफाईड बनविले आहे जो पाणी व धूळीपासून सुरक्षित राहतो. या फोनची स्क्रीन ओल्या हातांनी पण चालविली जाऊ शकते.















