6,000एमएएच बॅटरी असलेला Redmi 9 Power स्मार्टफोन 17 डिसेंबरला होईल भारतात लाॅन्च, अशी असेल किंमत

Xiaomi भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्यासाठी तयार आहे. गेल्या काही दिवसांत बातमी समोर आली होती कि शाओमी भारतीय बाजारात Redmi 9 Power नावाचा नवीन स्मार्टफोन लाॅन्च करण्याची तयारी करत आहे. आज कंपनीने यावर शिक्कामोर्तब करत आपल्या नवीन फोनच्या लाॅन्चची माहिती दिली आहे. शाओमीने अधिकृतपणे सांगितले आहे येत्या 17 डिसेंबरला कंपनी नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाॅन्च करेल.

शाओमीने सांगितले आहे कि कंपनी डिसेंबरच्या 17 तारखेला एक ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून रेडमी ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power भारतीय बाजारात येईल. हा लाॅन्च कंपनी द्वारे लाईव प्रसारित केला जाईल जो शाओमीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघता येईल. फोनची किंमत किती असेल आणि हा कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल, यासाठी 17 डिसेंबरची वाट बघावी लागले.

Redmi 9 Power

रेडमी 9 पावर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता चीन मध्ये हा स्मार्टफोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो.

शाओमी रेडमी 9 पावर बद्दल बोलले जात आहे कि भारतीय बाजारात हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे चायना मध्ये हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबतच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी रेडमी 9 पावर स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi 9 Power डुअल सिम फोन आहे ज्यात सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीला सपोर्ट करतो. लीकनुसार भारतात हा फोन Black, Blue आणि Green कलर मध्ये लॉन्च होईल. 15 डिसेंबरच्या लॉन्च डेटसाठी शाओमीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here