पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह

Vivo कंपनीने गेल्या वर्षीच्या शेवटी टेक मंचावर आपली ‘एक्स60 सीरीज’ सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात आणण्यासोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण आता हा फोन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

Vivo X60 Pro Plus 3सी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर Vivo V2056A सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे बरेचशे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण समजले आहे कि हा डिवायस 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह बाजारात येईल. चर्चा अशी आहे कि वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 12 जीबी रॅम मिळेल. लवकरच फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पण समोर येतील.

Vivo X60 Pro

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज

Vivo X60

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही. Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here