जगातील आघाडीच्या टेक ब्रँड एचपीने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन लॅपटॉप सादर केले आहेत. हे AI तंत्रज्ञानासह HP Omnibook X आणि HP Elitebook Ultra या नावाने लाँच केले गेले आहेत. कंपनीच्या मते अल्ट्रा मॉडेल कॉर्पोरेट वापरकर्त्यांसाठी उत्तम आहे. तर दुसरा पर्याय प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांसाठी चांगला ठरेल. दोन्ही बिल्ट-इन HP AI, Snapdragon X Elite प्रोसेसर, डेडिकेटेड Copilot key, एनपीयू सारख्या अनेक सुविधांनी सुसज्ज आहेत. त्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन यांची सविस्तर माहिती पुढे जाणून घ्या.
HP Omnibook चे स्पेसिफिकेशन
- HP Omnibook X लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा IPS टच डिस्प्ले आहे जो 2.2k रिझोल्यूशन आणि 300 निट्स ब्राईटनेस प्रदान करतो.
- डिव्हाईसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स एलिट प्रोसेसर उपलब्ध आहे आणि क्वालकॉम ॲड्रेनो ग्राफिक्स देखील लावण्यात आले आहे.
- लॅपटॉप एक समर्पित अशा 45 TOPS NPU सह येतो जो वापरकर्त्यांना जनरेटिव्ह AI कार्ये करण्यास अनुमती देतो.
स्टोरेजसाठी हा 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑफर करतो. - HP Omnibook X लॅपटॉप 59Whr ची बॅटरी असणारा आहे. ज्यामुळे 26 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. नवीन लॅपटॉप विंडोज 11 वर काम करतो. यात पूर्ण आकाराचा बॅकलिट किबोर्ड आहे. ज्यामध्ये एक समर्पित कोपायलट-की प्रदान करण्यात आली आहे.
- मीटिंग घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी 5MP IR वेबकॅम आहे. तर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत यात वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, दोन यूएसबी टाईप-सी पोर्ट, यूएसबी टाईप-ए पोर्ट आणि हेडफोन/मायक्रोफोन कॉम्बो जॅक समाविष्ट करण्यात आले आहे.
HP Elitebook Ultra चे स्पेसिफिकेशन
- HP Elitebook Ultra लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा टच डिस्प्ले आहे जो 2.2k स्क्रीन रिझोल्यूशन आणि 300 निट्स ब्राईटनेस प्रदान करतो.
- हे पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स एलिट चिपसेटसह सुसज्ज आहे आणि ॲड्रेनो ग्राफिक्स सोबत येते.
- डिव्हाईसमध्ये AI टास्कसाठी समर्पित 45 TOPS NPU तंत्रज्ञान दिले गेले आहे.
- हा 32GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत SSD स्टोरेज असणारा आहे.
- लॅपटॉपमध्ये 59Wh ची बॅटरी आहे, जी 65W USB Type-C चार्जरसह येते.
- हा लॅपटॉप विंडोज 11 वर देखील चालतो. यात 5MP IR वेब कॅमेरा आहे.
- HP Elitebook Ultra लॅपटॉप HP इमेज पॅड आणि फोटो सेन्सर-आधारित क्लिक पॅडसह पूर्ण-आकाराच्या बॅकलिट किबोर्डसह येतो.
- नवीन डिव्हाईसमध्ये ड्युअल ॲरे मायक्रोफोन आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील आहेत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, वायफाय 6E, ब्लूटूथ 5.2, दोन यूएसबी टाईप-सी पोर्ट, यूएसबी टाईप-ए पोर्ट आणि एक हेडफोन/मायक्रोफोन कॉम्बो जॅक दिले गेले आहेत.
HP Omnibook X आणि HP Elitebook Ultra ची किंमत
HP EliteBook Ultra ॲटमॉस्फेरिक ब्लू रंगात 1,69,934 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तर OmniBook X मेटीओर सिल्व्हर रंगात 1,39,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येतो. दोन्हींना एचपी वर्ल्ड स्टोअर्स आणि एचपी ऑनलाईन स्टोअर्समधून खरेदी केले जाऊ शकते.















