शाओमीच्या अल्ट्राला रियलमीचा मास्टर भिडणार; 100W फास्ट चार्जसह Realme GT 2 Master Explorer Edition लाँच

शाओमीनं काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Xiaomi 12s Ultra स्मार्टफोन सादर केला होता. हा क्वॉलकॉमच्या लेटेस्ट शक्तिशाली प्रोसेसर Snapdrgon 8+ Gen 1 चिपसेटसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन होता. शाओमीच्या धमाकेदार स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येणारा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी नव्या क्वॉलकॉम प्रोसेसरसह आपले फ्लॅगशिप फोन लाँच केले आहेत. Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोन कंपनीच्या जुन्या Realme GT Master Explorer Edition ची जागा घेईल. रियलमीच्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये शानदार डिजाइन, 120Hz AMOLED डिस्प्ले, LPDDR5X RAM, आणि 100W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

Realme GT 2 Master Explorer Edition ची डिजाइन

रियलमीचे “Master Edition” स्मार्टफोन अत्यतं आकर्षक डिजाईनसह सादर केले जातात. त्यानुसार Realme GT 2 Master Explorer Edition मध्ये प्लेन लेदर बॅक आणि मेटल चॅसी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले मिळतो, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. स्लिम बेजलसह येणाऱ्या या पॅनलला Gorilla Glass Victus चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

Realme GT 2 Master Explorer Edition चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ (1080 x 2400 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5G, WiFi 6E, Bluetooth 5.2, ड्युअल-फ्रीक्वेंसी GPS, NFC, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

रियलमीच्या या फोनमध्ये X7 ग्राफिक चिप देण्यात आली आहे. कंपनीनं क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरची पावर या हँडसेटमध्ये दिली आहे. फोनमध्ये ड्युअल व्हेपर चेम्बर लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे, जी फोनचे तापमान कमी ठेवते. फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. स्मार्टफोन Android 12 OS वर आधारित Realme UI 3.0 वर चालतो.

Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. हा फोन फक्त 25 मिनिटांत फुलचार्ज होतो. कंपनीनं यात 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. Realme GT 2 Master Explorer स्मार्टफोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप OIS सपोर्ट असलेल्या 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो. सोबतीला 50MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मायक्रो लेन्स देण्यात आली आहे जी 40x पर्यंत मॅग्निफिकेशनला सपोर्ट करते.

Realme GT 2 Master Explorer ची किंमत

Realme GT 2 Master Explorer स्मार्टफोनचे तीन मॉडेल चीमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 3,499 युआन (सुमारे 41,500 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 3,799 युआन (सुमारे 45,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर टॉप एन्ड 12GB रॅम व 256 GB स्टोरेज मॉडेल 3,999 युआन (सुमारे 47,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन ब्राऊन, ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये सादर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here