रियलमी लवकरच भारतात आपल्या आगामी स्मार्टफोन Realme X7 Max ची लॉन्च डेट सांगू शकते. कंपनीने हा स्मार्टफोन पुन्हा एकदा टीज करण्यास सुरुवात केली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन भारतात 4 मेला लॉन्च होणार होता. पण, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे Realme ने या स्मार्टफोनचा लॉन्च टाळला होता. आता वाटत आहे कि रियलमी या स्मार्टफोनच्या लॉन्चसाठी पूर्णपणे तयार आहे. Realme च्या वेबसाइटवर Realme X7 Max स्मार्टफोनसाठी बनवण्यात आलेल्या खास माइक्रोसाइटवरून हा फोन MediaTek Dimensity 1200 SoC सह भारतात येणारा हा पहिला स्मार्टफोन असेल, असे सांगितले आहे. त्याचबरोबर Realme India चे हेड माधव सेठ यांनी या स्मार्टफोनची डिजाइन टीज केली आहे ज्यात रियलमी आणि डेयर टू लीप लोगो दिसत आहे. या डिजाइनवरून समजते कि Realme X7 Max स्मार्टफोन Realme GT Neo चा रिब्रँड वर्जन असेल. (Realme X7 Max India launch has been officially teased)
Dare to Leap into the milky way?#FutureAtFullSpeed pic.twitter.com/MiNc7Wf6DP
— Madhav108MP (@MadhavSheth1) May 20, 2021
Realme X7 Max स्पेसिफिकेशन्स
Realme X7 Max स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा Realme GT Neo चा रिब्रँड असू शकतो. त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण अंदाज लावता येत आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. या फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये पंच होल दिला जाऊ शकतो. रियलमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC सह सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला हा स्वस्त फोन Xiaomi-Realme ला टक्कर देण्यास भारतात झाला लॉन्च
Realme X7 Max फोनमध्ये 12GB LPDDR5 RAM आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज दिला जाऊ शकतो. या फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर चालतो. रियलमीच्या या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर यात 50W फास्ट चार्ज दिला जाऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर दिला जाईल.
हे देखील वाचा : Battlegrounds Mobile India ची लॉन्च डेट आली समोर, बघा कधी करता येईल तुमच्या फोनमध्ये Download
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Realme GT Neo प्रमाणेच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमेरी कॅमेरा सेंसर, सोबतच 8MP ची वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला जाईल. रियलमीच्या या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर असू शकतो. कनेक्टिविटी पाहता यात 5G, 4G LTE, Bluetooth 5.1, डुअल-बॅंड Wi-Fi, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.