मात्र 6999 रुपयांमध्ये Redmi A3x ची सेल झाली सुरू, जाणून घ्या संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती

शाओमीने अधिकृत स्तरावर आपल्या स्वस्त स्मार्टफोन Redmi A3x ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. तसेच याआधी हा डिव्हाईस अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाला होता. तसेच, आता अधिकृत वेबसाईटवर सेलसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे फोन मात्र 6,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत मिळत आहे. यात AI कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 6.7 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले सारखे अनेक स्पेसिफिकेशन आहेत. चला, पुढे तुम्हाला किंमत आणि वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती देत आहोत.

Redmi A3x ची किंमत आणि उपलब्धता

  • ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर Redmi A3x दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.
  • डिव्हाईसच्या 3GB रॅम+64GB स्टोरेजची किंमत मात्र 6,999 रुपये आणि 4GB रॅम +128GB मेमरी व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे.
  • Redmi A3x फोनला ग्राहक मिडनाईट ब्लॅक, ओशन ग्रीन, ऑलिव ग्रीन आणि स्टारी पांढऱ्या सारख्या चार कलर मध्ये विकत घेता येईल.
  • तसेच मोबाईलचे फक्त बेस मॉडेल ऑनलाईन शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर पण मिळत आहे.

Redmi A3x चे स्पेसिफिकेशन

  • 6.71″ 90 हर्ट्स डिस्प्ले
  • यूनिसोक टी 603 प्रोसेसर
  • 4 जीबी रॅम + 128जीबी मेमरी
  • 8 एमपी ड्युअल AI रिअर कॅमेरा
  • 5 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले: Redmi A3x मोबाईलमध्ये कंपनीने 6.7 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले प्रदान केला आहे. यावर 1650 x 720 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सादर करण्यात आली आहे. तसेच युजर्सना 500 निट्स पीक ब्राईटनेस काला सपोर्ट मिळतो. तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ब्रँडने गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन दिले आहे.

चिपसेट: Redmi A3x चा प्रोसेसर पाहता कंपनीने यात एंट्री लेव्हल Unisoc T603 लावली आहे. जो या किंमतीमध्ये चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी पात्र आहे.

स्टोरेज आणि रॅम: फोनमध्ये 4 जीबी LPDDR4x RAM आणि 128 जीबी पर्यंत eMMC 5.1 स्टोरेज मिळत आहे.

कॅमेरा: Redmi A3x स्मार्टफोनमध्ये ड्युअल AI रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 0.08 मेगापिक्सलची इतर लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: Redmi A3x ला चालवण्यासाठी कंपनीने 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. युजर्सना फोनसह चांगला खासा बॅकअप मिळेल. तसेच, याला चार्ज करण्यासाठी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट मिळत आहे.

इतर: फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, AI फेस अनलॉक, ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, एफएम रेडियो, यूएसबी टाइप सी पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, 3.5mm हेडफोन जॅक सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Redmi A3x डिव्हाईस अँड्रॉईड 14 आणि एमआय युआयवर आधारित आहे. त्याचबरोबर कंपनी 2 वर्षाचे आणि ओएस आणि 3 वर्षाचे सुरक्षा अपडेट पण प्रदान करेल.

वजन आणि डायमेंशन: डिव्हाईसचे वजन आणि डायमेंशन पाहता हा 168.4 x 76.3 x 8.3mm आणि 193 ग्रॅमचा आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here