500km रेंज असलेली Pravaig Defy Electric SUV लाँच; झटक्यात मिळेल 210km चा वेग

बंगळुरू मधील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप Pravaig Dynamics नं देशात नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. Pravaig Defy नावाचा हा मॉडेल 39.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी बुकिंग सुरु केली आहे. नवीन Pravaig Electric SUV च्या पावरट्रेन सिस्टममध्ये 90.2kWh चा बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, हा सेटअप 402bhp आणि 620Nm टार्क जेनरेट करतो.

Defy EV सिंगल चार्जवर 500km पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100km ताशी स्पीड गाठू शकते तर हीचा टॉप स्पीड 210km ताशी आहे. फास्ट चार्जरचा वापर करून या एसयूव्हीचा बॅटरी पॅक फक्त 30 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. ही AWD (ऑल-व्हील ड्राईव्ह) ड्राईव्हट्रेन सिस्टमसह येते. कंपनीनं आतापर्यंत इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या डेवलपमेंटवर 18 मिलियन डॉलर पेक्षा जास्त खर्च केला आहे. हे देखील वाचा: Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

Pravaig Defy Electric SUV ची डिजाइन

Pravaig Defy इलेक्ट्रिक एसयूव्हीची डिजाइन खूप आकर्षक आहे. कारची डिजाइन मस्कुलर आणि शार्प दिसते. या कारमध्ये मस्कुलर फ्रंट फेंडर्स आणि क्रिस्प कॅरेक्टर लाइन्स आहेत. पारंपरिक हँडल्स ऐवजी कंपनीनं हे ईव्हीच्या बॉडीमध्ये इंटीग्रेट केले आहेत. ड्युअल-टोन थीमसह पूर्णपणे ब्लॅक ग्लास पॅनल आणि रूफ कारला एक प्रीमियम लुक देतो. ही स्पोर्टी दिसणाऱ्या ब्लॅक अलॉय व्हीलवर चालते आणि यलो ब्रेक कॉलिपर्ससह येते.

यात फ्लॅट-रूफ डिजाइन देण्यात आला आहे. मागच्या बाजूला एसयूव्ही कॉम्पॅक्ट रियर विंडशील्ड, रूफ स्पॉइलर आणि मस्कुलर टेलगेटसह येते. यात सर्वात आकर्षक स्लिक एलईडी टेललाइट देण्यात आली आहे जी कारची संपूर्ण रुंदी व्यापते. केबिनमधला लुक देखील खूप प्रीमियम आहे. कंपनीनं 11 एक्सटीरियर कलर ऑप्शन सादर केले आहेत, जसे की अ‍ॅम्परर पर्पल, टर्मरिक यलो, मून ग्रे, शनि ब्लॅक, इंडिगो, बोर्डो, 5.56 ग्रीन, लिथियम, वर्मिलियन रेड, काजीरंगा ग्रीन आणि सियाचिन ब्लू. हे देखील वाचा: बाजारावर राज्य करण्यासाठी रेडमीचा मोठा प्लॅन; Redmi K60 सीरिजमध्ये येणार तीन फोन, स्पेक्स लीक

Pravaig Defy Electric SUV चे फीचर्स

या इलेक्ट्रिक कारमध्ये डेविएलेट साउंड सिस्टम, 15.6 इंचाचा डिस्प्ले, पॅनोरमिक सनरूफ, अँबिएंट लाइटिंग, एयर फिल्टर, अल्ट्रा-फास्ट मीडिया स्ट्रीमिंग, वायरलेस फोन चार्जिंग, कूल्ड आणि इलेक्ट्रिकली एडजस्टेबल कॅप्टन सीट्स, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, रियर टचस्क्रीन आहे. यात कॅप्टन सीट्स इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्ट करता येतात. नवीन Pravaig Defy इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 234mm चा ग्राउंड क्लीयरेंस, 1215mm ची लेगरूम आणि 1050mm ची हेडरूम मिळते. कंपनीचा दावा आहे की यात ADAS फीचर्स मिळतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here