Samsung Galaxy M04 ची होऊ शकते भारतात एंट्री; मिळू शकते वर्चुअल रॅम टेक्नॉलॉजी

Samsung galaxy m04 india launch price specifications sale offer details in marathi

Samsung Galaxy M04 स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. आता लाँच पूर्वीच 91मोबाइल्सला या स्मार्टफोनविषयी माहिती मिळाली आहे. सॅमसंग कंपनी आपला हा लो बजेट डिवायस आगामी काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनची भारतातील किंमत 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते तसेच हा स्मार्टफोन वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह 8GB RAM परफॉर्मन्स देऊ शकेल.

Samsung Galaxy M04 Price in India

91मोबाइल्सला सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनची पोस्टर ईमेज मिळाली आहे ज्यात फोनच्या फोटो सोबतच त्याची प्राइस व फीचर्स टीज करण्यात आले आहेत. या ईमेजेस इंडस्ट्री सोर्सकडून मिळवण्यात आल्या आहेत. पुढील पोस्टर ईमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की कंपनीनं Samsung Galaxy M04 ची Price 8 हजारांच्या रेंजमध्ये दाखवली आहे. पोस्टरमध्ये फोनची किंमत 8,xxx लिहिण्यात आली आहे ज्यावरून वाटतं की सॅमसंग गॅलेक्सी एम04 भारतात 8,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होऊ शकतो. परंतु ताज्या माहितीनुसार हा फोन 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: रामायणातील ‘राम सेतू’ ची गोष्ट सांगणारा अक्षय कुमारचा चित्रपट ‘या’ OTT वर रिलीज झाला, परंतु…

Samsung galaxy m04 india launch price specifications sale offer details in marathi

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

किंमतीसह सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनमध्ये मिळणारा 8GB RAM देखील पोस्टरमध्ये हायलाइट करण्यात आला आहे. हा लो बजेट सॅमसंग स्मार्टफोन एक्सपांडेबल रॅम/वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो आणि या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फोनमध्ये 8जीबी रॅमची पावर मिळू शकते. Samsung Galaxy M04 4जीबी इंटरनल रॅमसह लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 4जीबी एक्सपांडेबल रॅम मिळू शकतो.

Samsung galaxy m04 india launch price specifications sale offer details in marathi

Samsung Galaxy M04 चे लीक स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम04 अलीकडेच गुगल प्ले कंसोलवर देखील दिसला होता जिथे फोन 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटसह दाखवण्यात आला होता. या मोबाइल फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समजलं आहे. या लिस्टिंगनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच होऊ शकतो तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलक्सी एम04 बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन जागतिक बाजारातील गॅलेक्सी ए04ई चा इंडियन व्हर्जन असू शकतो. Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला करतो. टेक मार्केटमध्ये गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच झाला आहे जो 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: खास बजेट युजर्ससाठी आला सुंदर Infinix ZERO 5G 2023; 13GB RAM सह मिळतोय 50MP कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04e मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्ससह या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here