गेल्या अनेक महिन्यांपासून वनप्लसच्या नंबर सीरीज अपग्रेडची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी, आता ब्रँडचे चीनमधील अध्यक्ष लुई ली यांनी आगामी OnePlus 13 स्मार्टफोनच्या लाँच टाईमलाईनची पुष्टी केली आहे. मोबाईल आगामी चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 आल्यानंतर येईल, अशी अपेक्षा आहे. चला , पुढे OnePlus 13 ची लाँच तारीख, वेळ आणि त्यात मिळणाऱ्या फिचर्सबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.
OnePlus 13 ची लाँच टाईमलाईन
- वनप्लसचे चीनमधील अध्यक्ष लुईस ली यांनी OnePlus 13 ची लाँच टाईमलाईन मायक्रो-ब्लॉगिंग साईट विबो वर सांगितली आहे.
- लुईस ली यांच्या मते नवीन फ्लॅगशिप डिव्हाईस पुढील महिन्यात लाँच केला जाईल. यात नवीन चिप म्हणजेच स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 असण्याचे देखील संकेत मिळाला आहे.
- क्वालकॉम आपला आगामी चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 पुढील महिन्यातच आणत आहे, याचा अर्थ या OnePlus 13 ही चिप आल्यानंतर चीनमध्ये येऊ शकतो.
- असेही नमूद करण्यात आले आहे की फोन गेन्शिन इम्पॅक्ट गेममध्ये 120Hz रिफ्रेश रेटपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
- जर भारत आणि जागतिक बाजारपेठेत OnePlus 13 च्या लाँचबद्दल बोलायचे झाल्यास तो मागील मॉडेलप्रमाणे जानेवारी 2025 मध्ये होऊ शकतो.
OnePlus 13 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: आगामी OnePlus 13 फ्लॅगशिपमध्ये BOE X2 डिस्प्ले मिळण्याच्या माहितीची देखील पुष्टी झाली आहे. तुम्हाला सांगतो की बीओई एक्स2 डिस्प्लेमध्ये उच्च ब्राईटनेस आणि डोळ्यांच्या चांगल्या संरक्षणाचा अनुभव मिळेल. तथापि, स्क्रीनच्या आकाराची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु यात 6.8 इंचाचा 8T एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले 2K क्वाड कर्व्ह तंत्रज्ञानासह मिळू शकतो. या स्क्रीनवर 1440 x 3168 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार असल्याचे समोर आले आहे.
- चिपसेट: OnePlus 13 मध्ये ब्रँड ऑक्टोबरमध्ये येत असलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 प्रोसेसर स्थापित करू शकतो. यासोबत O916T हॅप्टिक मोटर देखील लावली जाऊ शकते.
- कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT-808 प्रायमरी, 50 मेगापिक्सेलची IMX882 अल्ट्रावाईड लेन्स आणि 50 मेगापिक्सेलची पेरिस्कोप झूम असलेली IMX882 कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते.
- बॅटरी आणि चार्जिंग: OnePlus 13 मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते. तिला चार्ज करण्यासाठी यात 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असू शकतो.
- इतर: OnePlus 13 डिव्हाईस मध्ये मागील मॉडेलपेक्षा अपग्रेड असलेल्या IP68/69 धूळ आणि पाणी प्रतिकार तंत्रज्ञानाचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- ओएस: OnePlus 13 फोन अँड्रॉईड 14 आधारित कलरओएस 15 वर काम करू शकतो.














