50MP Camera सह युरोपात लाँच झाला नवीन TCL 40R 5G Phone; पाहा स्पेसिफिकेशन्स

टेक विश्वात जेव्हा एखादा नवीन मोबाइल फोन किंवा गॅजेट लाँच होताच सर्व ब्रँड्सच्या नजरा तिकडेच वळतात. टीसीएल कंपनीनं देखील आपला एक नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे जो TCL 40R 5G नावानं लाँच झाला आहे. हा एक 5जी फोन आहे जो कंपनीनं युरोपमध्ये लाँच केला गेला आहे. टीसीएल 40आर 5जी फोन 50MP Camera, 4GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

TCL 40R 5G Specifications

टीसीएल 40आर 5जी स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो तसेच 269पीपीआय, 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Samsung Galaxy Buds 2 Pro रिव्यू: या क्वॉलिटीला तोड नाही!

50 mp camera phone TCL 40 5G launched know price specifications details

TCL 40R 5G फोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो कंपनीच्या युआय 4.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन एआरएम जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो.

50 mp camera phone TCL 40 5G launched know price specifications details

फोटोग्राफीसाठी टीसीएल 40आर 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी TCL 40R 5G 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

TCL 40R 5G ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 3.5एमएम जॅक आणि एनएफसीसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी टीसीएल स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 164.46×75.4×8.99एमएम आणि वजन 192 ग्राम आहे. हे देखील वाचा: सॅमसंग घेऊन येतेय आणखी एक स्वस्त मोबाइल फोन Samsung Galaxy A14 4G; मिळेल 4GB RAM आणि लेटेस्ट Android 13

TCL 40R 5G Price

टीसीएल 40आर 5जी फोन युरोपियन मार्केटमध्ये सिंगल रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज तसेच 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. TCL 40R 5G ची आरंभिक किंमत €240 म्हणजे 19,000 रुपयांच्या आसपास आहे जो Stardust Purple आणि Starlight Black कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here