Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन

Ola Electric Car: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी OLA लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करणार आहे. आतापर्यंत OLA Electric Car Launch Date बद्दल ऑफिशियल खुलासा झाला नाही. परंतु आशा आहे की 2024 पर्यंत ही ईव्ही बाजारात येऊ शकते. आता Ola Electric नं पुन्हा एकदा Ola electric car चाका टीजर व्हिडीओ शेयर केला आहे. या Video मध्ये बंगळुरूमधील राइड शेयरिंग आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअपच्या आगामी इलेक्ट्रिक कारची झलक दिसत आहे. कंपनीनं हिला एक फ्यूचरिस्टिक स्टाइलिंग थीम असलेली प्रीमियम सेडान कार म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये बघता येईल की या कारचा लुक कसा असेल.

Video मध्ये बघा OLA EV चा लुक

व्हिडीओमध्ये दिसत आहे की या कारमध्ये समोरच्या बाजूला एक पातळ एलईडी लाइट्सची पट्टी असेल. ही पट्टी एका हेडलॅम्पपासून दुसऱ्या हेडलॅम्प पर्यंत पोहोचते. ही एका एयरोडायनॅमिक शेपमध्ये तयार करण्यात आली जी जे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जास्त रेंज मिळण्यासाठी खूप आवश्यक आहे. हे देखील वाचा: Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

तसेच नवीन टीजर इंटीरियरचा देखील दाखवण्यात आला आहे. व्हिडीओवरून स्पष्ट झालं आहे की कारमध्ये कंपनीनं एक आयताकृती स्टीयरिंग व्हील डिजाइन देण्याचा निर्णय घेतला आहे, मोठ्या प्रमाणावर राउंड स्टीयरिंग कार्समध्ये मिळतात. ओला लोगो सेंटरमध्ये असेल आणि बॅकलिट स्टीयरिंग कंट्रोलनं भररलेली असेल.

साइड मिरर मिळणार नाहीत

या कारचे अन्य डिजाइन डिटेल्स पाहता यात रियर व्यूसाठी डोरवर मिळणारे मिरर दिसत नाहीत, कारण त्याजागी असे कॅमेरा दिले जातील ज्यामुळे ड्रायव्हरला स्क्रीनवरून मागून येणाऱ्या व्हेईकल्स आणि अन्य ऑबजेक्ट्सवर नजर ठेवता येईल. यात फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अँबियंट लाइटिंग सारखे प्रीमियम फीचर्स दिले जाऊ शकतात. तसेच यात एक फुल ग्लास रूफ देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: लो बजेटमध्ये रेडमी-रियलमीचा गेम फिनिश करण्याची तयारी; Samsung Galaxy F04s लवकरच येणार बाजारात

Ola EV car price (expected)

ओला या कारची किंमत 25 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवू शकते. परंतु सध्या भारतात 25 लाख रुपयांपेक्षा खालच्या ईव्ही सेगमेंटमध्ये सर्वात जास्त ग्राहक आहेत. ओलाचा उद्देश अशी कार बनवण्याचा आहे जी फक्त 5 सेकंदात 0 ते 100 किमी ताशी वेग गाठू शकेल, तसेच कारची रेंज 500 किमी ठेवण्याचा प्रयत्न देखील करू शकते. परंतु ही अधिकृत माहिती नाही, त्यामुळे जोपर्यंत ही कार बाजारात येत नाही तोपर्यंत काही स्पष्ट होणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here