मिलिट्री ग्रेड रेटिंगसह भारतात लाँच झाला स्वस्त Motorola Edge 50 Neo, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Motorola Edge 50 Neo भारतात लाँच झाला आहे. हा Edge 50 सीरीज मधील पाचवा फोन आहे. त्याला परवडणाऱ्या किमतीत डायमेंसिटी 7300 चिपसेट, 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज, MIL810H मिलिट्री ग्रेड सर्टिफाईड रेटिंग, पाणी आणि धूळ संरक्षित IP68 रेटिंग सारख्या अनेक शक्तिशाली फिचर्ससह सादर केले गेले आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल आऊट्सलेटवर होईल. चला, पुढे तुम्हाला Moto Edge 50 Neo ची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर समजावून सांगूया.

Motorola Edge 50 Neo ची किंमत आणि उपलब्धता

Motorola Edge 50 Neo भारतात 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजमध्ये येतो. त्याची किंमत 23,999 रुपये आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला HDFC बँक कार्डच्या व्यवहारांवर 10 टक्क्यांची झटपट सूट मिळेल. हा विशेष सेल अंतर्गत आज संध्याकाळी 7 वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. तर साधारणपणे 24 सप्टेंबरपासून तो फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया ऑनलाईन स्टोअर आणि ऑफलाईन स्टोअरवर विकला जाईल.

Motorola Edge 50 Neo चे डिझाईन

डिव्हाईसमध्ये ग्राहकांना व्हेगन लेदर फिनिश डिझाईन दिले जात आहे. हा फोन IP68 MIL810H मिलिट्री ग्रेड सर्टिफाईड रेटिंगसह येतो. फोनसाठी वापरकर्त्यांना नॉटीकल ब्लू, लट्टे, ग्रिसेल आणि पॉईन्सियाना सारखे चार रंगांचे पर्याय मिळतील. स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर एक उंच कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यामध्ये कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे. त्याचवेळी, समोरची बाजू फ्लॅट पॅनेलसह येत आहे. तर उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम ही बटणे दिली गेली आहेत.

Motorola Edge 50 Neo चे स्पेसिफिकेशन

  • 6.4 इंचाचा एलटीपीओ डिस्प्ले
  • डायमेंसिटी 7300 चिपसेट
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 50MP रिअर कॅमेरा
  • 32MP फ्रंट कॅमेरा
  • 4310mAh बॅटरी
  • 68W फास्ट चार्जिंग
  • IP68 रेटिंग

डिस्प्ले: Motorola Edge 50 Neo स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा वाईड सुपर एचडी एलटीपीओ डिस्प्ले मिळत आहे. या स्क्रीनवर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 3,000 निट्स पीक ब्राईटनेस, 100 टक्के डीसीआय पी3 कलर गॅमट आणि 10-बिट कलर्स देण्यात येत आहेत. एवढेच नाही तर मोबाईलची स्क्रीन सपाट ठेवली जाईल सोबतच कमीत कमी बेझल्ससह पंच होल कटआऊट उपलब्ध मिळत आहे.

चिपसेट: Motorola Edge 50 Neo मध्ये ब्रँडने सामान्य कार्ये आणि इतर अवजड ऑपरेशन्स लक्षात घेऊन मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेटचा वापर केला आहे. हा 4 नॅनोमीटरवर तयार केलेला ऑक्टाकोर चिपसेट आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना 2.5 गिगाहर्ट्झ पर्यंतच्या उच्च क्लॉक स्पीडचा अनुभव मिळतो.

स्टोरेज आणि रॅम: Motorola Edge 50 Neo मध्ये ब्रँडतर्फे स्पीडसाठी 8 जीबी पर्यंत LPDDR4X राम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ते वाढवता देखील येऊ शकते.

कॅमेरा: या हँडसेटमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50 मेगापिक्सेलचा सोनी LYTIA 700C प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड/मॅक्रो कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी Motorola Edge 50 Neo मध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Motorola Edge 50 Neo मोबाईलमध्ये 4310mAh ची बॅटरी बसविण्यात आली आहे. तिला लवकर चार्ज करण्यासाठी 15W वायरलेस चार्जिंग आणि 68W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे.

इतर: Moto Edge 50 Neo फोनमध्ये एआय स्टाईल सिंक आणि एआय मॅजिक कॅनव्हास सारखी वैशिष्ट्ये वॉलपेपर आणि इमेज तयार करण्याच्या कामासाठी दिले गेले आहेत. हे ड्युअल सिम 5G, वायफाय 6ई, ब्लूटूथ 5.3, पाणी आणि धूळ प्रतिरोधक IP68 रेटिंग ने सुसज्ज आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: Edge 50 Neo मोबाईल अँड्रॉईड 14 वर आधारित आहे. ब्रँडने त्यासोबत 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स आणि 5 ओएस अपग्रेड देण्याचे ही वचन दिले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here