OnePlus 13 मध्ये मिळू शकते व्हेगन लेदर डिझाईन, पाहा लीक झालेले फोटो आणि वैशिष्ट्ये

OnePlus च्या नंबर सीरीजचा आगामी OnePlus 13 स्मार्टफोन गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप डिव्हाईस बनणार आहे. असे सांगण्यात येत आहे की, पुढील महिन्यात त्याचा प्रवेश होऊ शकतो. तर, लॉन्चपूर्वी लीकमध्ये डिव्हाईसचे नवीन व्हेगन लेदर डिझाईन आणि मुख्य स्पेसिफिकेशन शेअर केली गेली आहेत. चला, पुढे तुम्हाला समोर आलेली माहिती सविस्तर सांगत आहोत.

OnePlus 13 चे डिझाईन (लीक)

टिपस्टर संजू चौधरीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर OnePlus 13 स्मार्टफोनबद्दलची माहिती दिली आहे.
तुम्ही खालील पोस्टमध्ये पाहू शकता की टिपस्टरनुसार OnePlus 13 हिरव्या रंगाच्या व्हेगन लेदर बॅकसह येऊ शकतो.
पोस्टमध्ये स्मार्टफोनचा रफ रेंडर देखील शेअर केला गेला आहे की, जो संदर्भ आणि आयडियासाठी असल्याचे म्हटले आहे.
अनोख्या डिझाईन व्यतिरिक्त फोनमध्ये मागील मॉडेलप्रमाणे मोठे वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश पहायला मिळत आहे. तर मध्यभागी कंपनीचा ब्रँडिंग लोगो आहे.

OnePlus 13 ची लाँच टाईमलाईन

काही दिवसांपूर्वी वनप्लसचे चीनमधील अध्यक्ष लुईस ली यांनी OnePlus 13 च्या लाँच टाईमलाईनचा खुलासा केला होता. त्यांच्या मते नवीन फ्लॅगशिप डिव्हाईस पुढील महिन्यात लाँच होईल. यामध्ये आगामी नवीन चिप म्हणजे स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 असण्याचे संकेतही मिळाले होते.

OnePlus 13 चे स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

  • डिस्प्ले: आगामी OnePlus 13 मध्ये BOE X2 डिस्प्ले मिळण्याच्या माहितीची ब्रँडने पुष्टी केली आहे. ही स्क्रिन उच्च ब्राईटनेस आणि उत्तम डोळ्यांचे संरक्षण प्रदान करेल. तथापि, स्क्रीनच्या आकाराची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु यामध्ये 6.8 इंचाचा 8T एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले 2K क्वाड कर्व्ह तंत्रज्ञानासह दिला जाऊ शकतो. त्यावर 1440 x 3168 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट असू शकतो.
  • चिपसेट: OnePlus 13 मध्ये ब्रँड ऑक्टोबरमध्ये येत असलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 प्रोसेसर देऊ शकतो. यासोबतच O916T हॅप्टीक मोटरचा वापर केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT 808 1/1.4″ प्रायमरी सेन्सर, 3x झूम सह 50 मेगापिक्सेलची LYT 600 1/1.95″ पेरिस्कोप लेन्स आणि 50 मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्स दिली जाऊ शकते.
  • बॅटरी आणि चार्जिंग: OnePlus 13 मध्ये 6000 एमएएच ची मोठी बॅटरी मिळू शकते. तिला चार्ज करण्यासाठी यात 100 वॉट वायर्ड चार्जिंग आणि 50 वॉट वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.
  • इतर: OnePlus 13 डिव्हाईस मध्ये मागील मॉडेलपेक्षा अपग्रेड असलेल्या IP68/69 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स तंत्रज्ञान दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. तर सुरक्षेसाठी अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर लावला जाऊ शकतो.
  • ओएस: OnePlus 13 फोन अँड्रॉईड 14 आधारित कलर ओएस 15 वर बेस्ड असू शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here