भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक

Highlights

  • केंद्र सरकारनं 138 betting apps आणि 94 लोन अ‍ॅप बॅन केले आहेत.
  • हे अ‍ॅप्स सरकारनं IT Act Section 69 अंतगर्त बॅन केले आहेत.
  • जबरदस्तीने पैसे वसुली आणि युजर्सचा छळ केल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे कारवाई.

गृह मंत्रालय (एमएचए) च्या शिफारशीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनशी संबंधित 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 लोन देणारे अ‍ॅप्स बॅन केले आहेत. सरकारनं IT Act Section 69 अंतगर्त एकूण 230 अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत. सूत्रांनुसार, याची पुष्टी उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. जबरदस्तीने वसुली आणि युजर्सच्या छळाच्या अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारनं ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

अ‍ॅप्सचा संबंध चीनशी

हे अ‍ॅप चीनी नागरिकांचे होते ज्यांनी कथितरित्या भारतीयांना कामाला ठेवलं होतं आणि त्यांना प्रमुख निर्देशक बनवलं होतं. रिपोर्ट्सनुसार, हताश लोकांना कर्जाचं अमिश दाखवलं जात होतं आणि आणि मग त्यांच्याकडून वर्षाला 3,000 टक्के पर्यंतची व्याज वसुली केली जात होती. जेव्हा ग्राहक व्याज चुकतं करू शकत नव्हते तेव्हा या अ‍ॅप्सचे प्रतिनिधी त्यांना त्रास देण्यास सुरु करत. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

अ‍ॅप्सचे अनेक प्रतिनिधी ग्राहकांना धमकी देत की ते कर्ज घेणाऱ्या लोकांचे मॉर्फ्ड फोटोज प्रसिद्ध करू शकतात आणि त्यांना बदनाम करू शकतात. हे प्रकरण अनेक आत्महत्या झाल्यानंतर उघडकीस आलं. खासकरून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये, ज्या लोकांनी अशाप्रकारच्या अ‍ॅप्सकडून कर्ज घेतलं आणि सट्टेबाजीच्या अ‍ॅपवर पैसे गमावले. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलंगणा, ओरिसा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांसह केंद्रीय गुप्तहेर एजन्सीनी केंद्रीय गृह मंत्रालयाला अ‍ॅप विरोधात कारवाई करण्यास सांगितलं होतं. हे देखील वाचा: विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच; Vivo X90 आणि Vivo X90 Pro येत आहेत भारतात

इनपुट्सच्या आधारावर, गृह मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी 28 लोन देणाऱ्या चिनी अ‍ॅपचे विश्लेषण सुरु केले होते. त्यातून समजलं की ई-स्टोरवर 94 अ‍ॅप उपलब्ध आहेत आणि अन्य थर्ड-पार्टी लिंकच्या माध्यमातून काम करत आहेत. हे अ‍ॅप आता स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाहीत परंतु सूत्रांनुसार, सट्टेबाजीचे अ‍ॅप आणि गेम आता स्वतंत्र लिंक किंवा वेबसाइटच्या माध्यमातून डाउनलोड केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here