हुआवई ची सब ब्रँड कंपनी आॅनर ने याच वर्षी मी महिन्यात आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस आॅनर 10 भारतात लॉन्च केला होता. हा फोन कंपनी ने नॉच डिस्प्ले सह सादर केला होता जो 32,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. स्टाइलिश लुक असलेल्या आॅनर 10 नंतर आता कंपनी आपल्या फॅन्सना अजून एक नवीन भेट देण्याची तयारी करत आहे. आॅनर येत्या 21 नोव्हेंबरला आॅनर 10 चा नवीन वर्जन आॅनर 10 लाइट नावाने अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर सादर करणार आहे.
आॅनर ने घोषणा केली आहे कि कंपनी 21 नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 10 लाइट टेक मंचावर सादर करेल. आॅनर ने सांगितले कि नोव्हेंबरच्या 21 तारखेला चीन मधील बीजिंग शहरात कपंनी एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून आॅनर 10 लाइट टेक बाजारात येईल. नावावरून समजतेच कि कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन आॅनर 10 चा छोटा वर्जन असेल जो स्वस्तात सेल साठी उपलब्ध होईल.

कंपनी ने अजूनतरी आॅनर 10 लाइटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही. पण वेगवेगळ्या विभिन्न मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे कि आॅनर 10 लाइट एंडरॉयड ओरियो वर सादर केला जाईल सोबतच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. आॅनर 10 लाइट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल.
आॅनर 10 लाइट च्या स्पेसिफिकेशन्स साठी कंपनीच्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे. एवढे निश्चित कि आॅनर 10 प्रमाणे हा फोन स्टालिश व आर्कषक लुक तसेच डिजाईन सह लॉन्च होईल. आशा आहे कि आॅनर 10 लाइट 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. पण चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतात यायला या फोनला थोडा वेळ लागू शकतो.













