Realme 9i 5G च्या एमआरपीवर 3000 रुपयांचा डिस्काउंट

रियलमीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात नवीन 5जी मोबाइल फोन लाँच केला आहे. मिडबजेटमध्ये लाँच झालेला Realme 9i 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. रियलमी 9आय 5जी फोनमध्ये 90Hz Display, 50MP Camera, MediaTek Dimensity 810 5G चिपसेट आणि 18W 5,000mAh Battery मिळते. इतके दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हा हँडसेट आता डिस्काउंटसह विकला जात आहे. या स्मार्टफोनवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया Realme 9i 5G वरील डील्स.

Realme 9i 5G वरील डील्स

Realme 9i 5G स्मार्टफोनचा 4GB RAM व 64GB Storage असलेला बेस मॉडेल 14,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट झाला आहे, ज्याची एमआरपी 17,999 रुपये आहे. 3000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह अन्य ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन खरेदी करताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी सूट मिळवू शकता. सर्वात बेस्ट ऑफर म्हणजे Realme 9i 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर फक्त 520 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेता येईल. हे देखील वाचा: HP Smart Tank 580 Printer Review: छोट्या उद्योजकांसाठी बेस्ट प्रिंटर; प्रिंटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी नवा पर्याय

रियलमी 9आय 5जी फोनचे भारतात दोन व्हेरिएंट्स आले आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हा नवीन रियलमी मोबाइल Soulful Blue, Rocking Black आणि Metallica Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 9आय 5जी स्मार्टफोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Realme 9i 5G अँड्रॉइड 12 वर लाँच करण्यात आला आहे जो रियलमी युआय 3.0 सह मिळून चालतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डिमेन्सिटी 810 5जी चिपसेट आणि माली-जी57 एमसी2 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी 9आय 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन आणि 75GB अतिरिक्त डेटा फ्री; असा प्लॅन जियो-एयरटेलकडेही नाही

रियलमी 9आय 5जी एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर देखील चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here