भारतासह जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्मार्टफोनपासून दूर जाऊन फ्लिप फोन वापरण्याची इच्छा असते. तथापि, त्यांची किंमत जास्त असल्याने अनेक ग्राहक त्याला खरेदी करू शकत नाहीत. जर तुम्ही देखील या ग्राहकांपैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला खूप अप्रतिम डिल सांगत आहोत. ज्यामध्ये फ्लिप मोबाईल फक्त 29,899 रुपयांना मिळेल. एवढेच नाही तर डिव्हाईसवर बँक डिस्काऊंट आणि एक्सचेंज सारखे पर्यायही मिळतील. हा फोन टेक्नो कंपनीने गेल्या वर्षी TECNO Phantom V Flip 5G नावाने लाँच केला होता. चला, पुढे जाणून घेऊया Phantom V Flip वर मिळत असलेल्या ऑफरचा तुम्ही लाभ कसा घेऊ शकता?
TECNO Phantom V Flip 5G ची किंमत आणि ऑफर्स
- ऑनलाईन शॉपिंग साईटवर TECNO Phantom V Flip 5G हा 25,000 रुपयांच्या कूपन डिस्काऊंटसह विकला जात आहे. त्याची वास्तविक किंमत 54,899 रुपये सूचीबद्ध आहे. ज्यावर कूपन डिस्काऊंट लागू केल्यानंतर त्याची किंमत 28,999 रुपये होईल.
- जर बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास डिव्हाईसवर एसबीआय बँक क्रेडिट, डेबिट कार्ड ईएमआय आणि सामान्य व्यवहारांवर 1,500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. जी फोनची किंमत आणखी कमी म्हणजेच 28,399 रुपये करते.
- जर ग्राहक त्यांचा जुना फोन विकून TECNO Phantom V Flip 5G खरेदी करत असतील तर कंपनीकडून 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तथापि, हे जुन्या फोनच्या स्थितीनुसार दिले जाईल.
- या ऑफर्स व्यतिरिक्त फोनला नो कॉस्ट ईएमआय द्वारे 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर देखील घेतले जाऊ शकते.
तुम्ही TECNO Phantom V Flip 5G ची खरेदी करावी का?
सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आतापर्यंत एकही फ्लिप स्मार्टफोन इतक्या कमी किमतीत विकला जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला फोल्डेबल फ्लिप फोन हवा असेल तर तो हा कमी बजेटमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये ग्राहकांना 256 जीबी पर्यंत स्टोरेज, 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 6.9 इंच मोठा प्रायमरी डिस्प्ले, 1.32 इंच सेकंडरी डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 8050 चिपसेट सारखे अनेक स्पेसिफिकेशन मिळत आहेत. त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत देखील हा चांगला आहे.
TECNO Phantom V Flip 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: TECNO Phantom V Flip 5G मध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी 6.9 इंचाचा एएचडी+ फ्लॅक्सिबल ॲमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. तर, सेकंडरी स्क्रीन म्हणून 1.32 इंचाचा गोलाकार ॲमोलेड डिस्प्ले आहे.
- प्रोसेसर: Tecno Phantom V Flip स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8050 प्रोसेसर आहे, यात ग्राफिक्ससाठी माली-जी77 जीपीयू मिळत आहे.
- रॅम आणि स्टोरेज: हा डिव्हाईस 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. त्यासोबतच 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट आहे.
- कॅमेरा: TECNO Phantom V Flip 5G फोल्डेबल फोनमध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सेलचा RGBW प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड-एंगल लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी डिव्हाईसमध्ये 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000 एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे.
- इतर: हा फोन स्टिरिओ स्पीकर, अल्ट्रा-थिन व्हीसी लिक्विड कूलिंग, एएफसी, ड्युअल सिम 5G, 4G, वायफाय ब्लूटूथ यांसारख्या अनेक फिचर्सने सुसज्ज आहे.
- ओएस: TECNO Phantom V Flip 5G अँड्रॉईड 13 सह आला होता ज्यात ओएस आणि सुरक्षा अपडेट्स देखील मिळतील.














