Vivo नं आपल्या Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. विवोचा हा फोन Vivo Y30 5G नावानं थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे जो कंपनीचा लेटेस्ट बजेट 5G स्मार्टफोन आहे. हा फोन लवकरच भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात येईल. Vivo नं आधीच हा बजेट 5G स्मार्टफोन भारतात येणार असल्याची माहिती दिली आहे. थायलंडमध्ये विवो Y30 5G स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं ग्राहकांना दोन कलर ऑप्शन उपलब्ध करवून दिले आहेत. या फोनचा बॅक कॅमेरा मॉड्यूल Vivo T1 5G सारखा दिसते जो अलीकडेच भारतात लाँच झाला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Vivo Y30 5G स्मार्टफोनच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती देत आहोत.
Vivo Y30 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y30 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये MediaTek च्या Dimensity 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तसेच यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 2GB अतिरिक्त रॅम देखील मिळेल, म्हणजे एकूण 8GB रॅमची ताकद या विवो फोनमध्ये मिळते. त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी microSD कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसती या स्वस्त Vivo Y30 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबतीला 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमधील 8MP चा फ्रंट कॅमेरा वापरता येईल. विवोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ 720 x 1600 पिक्सल आहे. यात फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टायल नॉच दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. Vivo Y30 5G स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. तसेच हा फोन AI फेस अनलॉकला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल सिम, वायफाय, Bluetooth 5.1 देण्यात आलं आहे. हा फोन Android 12 आधारित Funtouch OS 12 वर चालतो.
Vivo Y30 5G ची किंमत
Vivo Y30 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह थायलंडमध्ये आलेल्या या हँडसेटची किंमत THB 8,699 (सुमारे 18,950 रुपये) ठेवण्यात आली आहे. विवोचा हा फोन स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं भारतीय लाँचची घोषणा केली आहे परंतु देशातील किंमत थोडी वेगळी असू शकते.















