शाओमी इंडिया ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन थोड्याच काळात शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणीत सामील झाले आहेत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्स व कमी किंमतीती मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. हे यश एक पाऊल अजून पुढे नेण्याची तयारी शाओमी करत आहे. शाओमी ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 22 नोव्हेंबरला भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमीचा हा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रो असेल.
शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत सांगतिले आहे कि कंपनी 22 नोव्हेंबरला राजधानी दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. कंपनी ने यादिवशी कोणता फोन लॉन्च होईल हे सांगितले नाही पण हा 22 नोव्हेंबरला लॉन्च होणार फोन गेल्या महिन्यात थाईलँड मध्ये लॉन्च झालेला रेडमी 6 प्रो असू शकतो. शाओमी ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द न्यू नोट राईज‘ टॅगलाईन वापरली आहे ज्यावरून स्पष्ट होते कि कंपनीचा आगामी फोन नोट सीरीज मध्येच येईल.
शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो थाईलँड मध्ये लॉन्च केला आहे तिथे फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भारतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.
कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.भारतात फोनची किंमत काय असेल तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 22 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.
















