18 मे पासून होईल 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेल्या Oppo F11 चा सेल, किंमत असेल 19,990 रुपये

ओपो ने मार्च मध्ये भारतात आपले स्मार्टफोन्स वाढवत एफ सीरीज मध्ये दोन नवीन फोन लॉन्च केले होते. यात Oppo F11 आणि Oppo F11 Pro चा समावेश होता. F11 Pro फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह पॉप-अप सेल्फी कॅमेरा वर लॉन्च झाला होता तर F11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली होती. Oppo F11 Pro मार्च मध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता पण कंपनी ने Oppo F11 बाजारात आणला नव्हता. आता बातमी येत आहे कि Oppo F11 येत्या 18 मे पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo F11 सेल संबंधित माहिती द मोबाईल इंडियन ने दिली आहे. या वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि 18 मे पासून Oppo F11 भारतात सेल साठी उपलब्ध होईल. सूत्रांकडून आलेल्या या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Oppo F11 आनलाईन शॉपिंग साइट्स सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल. Oppo F11 ची किंमत कंपनी द्वारा 19,990 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच 18 मे पासून हा फोन मार्बल ग्रीन आणि पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo F11 कॅमेरा
ओपो एफ सीरीजची सर्वात मोठी यूएसपी हिचा कॅमेरा सेग्मेंट आहे. Oppo F11 आणि F11 Pro दोन्ही फोन मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. Oppo F11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo F11 स्पेसिफिकेशन्स
Oppo F11 कंपनी ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे.

Oppo F11 इंडिया मध्ये 4जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतो. Oppo F11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,020एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here