3जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी असलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनची किंमत झाली 1,000 रुपयांनी कमी

टेक कंपनी ओपो ने ​​ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन ए3एस लॉन्च ​केला होता. हा फोन देशात दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो दुसर्‍या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर आता आपल्या यूजर्सना भेट देत ओपो इंडिया ने ए3एस स्मार्टफोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ओपो ने ए3एस स्मार्टफोन च्या 3जीबी रॅम वेरिएंट ची किंमत कमी केली आहे. कंपनी ने हा वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. दिवाळीच्या आधी पण कंपनी ने आपल्या या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती. तर आता पुन्हा एकदा यूजर्सना भेट देत कंपनी ने ओपो ए3एस च्या 3जीबी रॅम व 32जीबी वाल्या वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. यानंतर ओपो ए3एस च्या 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here