6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च

Samsung आपल्या Galaxy M सीरीजच्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि या सीरीज मध्ये लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Galaxy M30s होईल. चर्चा अशी आहे कि कंपनी सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. Samsung Galaxy M30s सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे आणि या फोनच्या बॅक कवरचा फोटो पण समोर आला आहे. आता Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स व बॅटरी डिटेल्सचा पण खुलासा झाला आहे. भारतात लॉन्च होण्याआधी Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स टेक मंचावर आले आहेत.

सर्वात आधी Samsung Galaxy M30s 15 सप्टेंबरच्या आसपास इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि कंपनी आपला हा आगामी डिवाईस 6,000एमएएच च्या मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे Samsung चा कोणत्याही स्मार्टफोन मध्ये आतापर्यंत इतक्या पावर असलेली बॅटरी मिळाली नाही. त्यामुळे Galaxy M30s Samsung चा सर्वात मोठ्या बॅटरी वाला फोन असेल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung ने अजूनतरी Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स व लॉन्च डेट सांगितली नाही पण आशा आहे कि येत्या 15 सप्टेंबर किंवा या तारखेच्या आसपास Samsung Galaxy M30s भारतात लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here