जापानी कंपनी पॅनासोनिक ने मागच्या महिन्यात भारतात आपला बेजल लेस स्मार्टफोन पी101 लॉन्च केला होता जो 6,999 रुपयांच्या किंमतीत रिटेल चेन संगीता मोबाईल्स वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे. तर आज आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत पॅनासोनिक ने पी95 लॉन्च केला आहे. पॅनासोनिक ने हा फोन फक्त 4,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे जो 13 मे पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. 13 मे पासून 16 मे पर्यंत चालणार्या फ्लिपकार्ट च्या बिग शॉपिंग डेज सेल मध्ये पॅनासोनिक पी95 फक्त 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
पॅनासोनिक पी95 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी डिसप्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 7.1.1 नुगट आधारित आहे तसेच 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसेर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 212 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने पॅनासोनिक पी95 मध्ये 1जीबी ची रॅम मेमरी दिली आहे. या फोन मध्ये 16जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.
पॅनासोनिक पी95 4जी वोएलटीई फोन आहे ज्यात ब्लूटूथ, वाई-फाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पॅनासोनिक पी95 फ्लिपकार्ट च्या बिग शॉपिंग डेज सेल मधील 4 दिवसांमध्ये 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर 16 मे नंतर हा फोन आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर ब्लू, गोल्ड व डार्क ग्रे कलर वेरिएंट मध्ये 4,999 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध होईल.















