जियोचे 4 दीर्घ वैधता असलेले प्लान, आहेत का फायदेशीर?

रिलायंस जियो ने भारतीय मोबाईल बाजाराची दिशा बदलून टाकली आहे यात शंका नाही. कंपनी सुरवातीपासूनच भारतात आक्रमक होती. कंपंनीने पहिल्या सहामहिन्यांपर्यंत लोकांना मोफत डेटा व कॉलिंग दिली. नंतर जेव्हा शुल्क लागू केले तेव्हा खूप कमी होते. इतकेच नव्हे तर जियो नेटवर्क वर कॉलिंग कायमची फ्री आहे फक्त डेटाचा रिचार्ज करायचा असतो. रिलायंस जियो द्वारा देण्यात येणाऱ्या या सेवांमुळे लोकांनी जियो सिम हातोहात घेतले आणि लॉन्च नंतर अवघ्या वर्षभरात कंपनी ने 10 कोटी यूजरचा आंकडा पार केला. आता तीन वर्षे होणार आहेत आणि 30 कोटी यूजर बेस होणार आहे. आता पण जियो सर्वात कमी किंमतीती डेटा आणि कॉलिंग सेवा देत आहे. परंतु जियोच्या सर्वच ऑफर्स चांगल्या आहेत असेही नाही असे अनेक प्रीपेड टॅरिफ प्लान आहेत जे महाग आहेत. विशेष म्हणजे हे दीर्घ वैधतेसह सादर केले गेले आहेत पण हे यूजर्ससाठी फायेदशीर आहेत का? चला खाली बघूया आणि याची सविस्तर चर्चा करूया.

जियोचा 999 रुपयांचा प्लान

रिलायंस जियो ने दीर्घ वैधतेसह प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे ज्यात पहिला प्लान आहे 999 रुपयांचा. या प्लान अंतर्गत तुम्हाला 60जीबी चा डेटा 90 दिवसांच्या वैधते सह मिळतो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच नॅशनल रोमिंग तर फ्री आहेच सोबत कंपनी रोज 100 मेसेज पण देते. जर प्रति महिन्याचा विचार केला तर या प्लानची किंमत तुम्हाला 333 रुपये पडेल आणि प्रतिदिनच्या हिशोबाने 1 दिवसात फक्त 666एमबी डेटा मिळेल जो आजच्या हिशोबाने थोडा महाग म्हणता येईल.

परंतु तुम्हाला माहिती असेल कि जियोच्या 399 के प्लानची वैधाता 84 दिवस आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.5जीबी 4जी डेटा मिळतो. एकूण 126जीबी डेटा दिला जातो जो 999 रुपयांच्या 60जीबी डेटा पेक्षा भरपूर जास्त आहे. इतकेच नव्हे तर 399 रुपयांच्या प्लान मध्ये पण कॉलिंग अनलिमिटेड आहे.

पण 999 रुपयांच्या प्लानची चांगली बाजू अशी कि तुम्ही 60जीबी डेटाचा वापर कधी करू शकता तर 399 रुपयांमध्ये तुम्ही एक दिवसात 1.5जीबी डेटाचा वापर करू शकता. पण जेव्हा जास्त डेटाची गरज असेल तेव्हा तुम्ही डेटा टॉप अप घेऊ शकता.

जियो 1,999 रुपयांचा प्लान

जियोचा दीर्घ वैधतेसह येणार हा प्लान पण तेवढाच तोट्याचा आहे. जियोच्या या प्लानची किंमत 1,999 रुपये आहे, ज्यात तुम्हाला 180 दिवसांची वैधता मिळते. या टॅरिफ प्लान मध्ये यूजर्सना 125जीबी हाई-स्पीड 4जी डेटा मिळतो. तसेच 125जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर पण यूजर्स 64केबीपीएस स्पीड मध्ये डेटाचा वापर करू शकतात. नॅशनल कॉलिंग, नॅशनल रोमिंग फ्री आहे सोबत रोज 100 एसएमएस पण दिले जातात. या पण जर महिन्याच्या आधारावर पहिला तर जवळपास 333 रुपये तुम्ही देता आणि रोजचा 694एमबी व महिन्याच्या हिशोबाने जवळपास 41जीबी डेटा मिळतो जो महागच आहे.

परंतु रिलायंस जियोचा एक प्लान 498 रुपयांचा आहे जो 91 दिवस वैधतेसह येतो. यात तुम्हाला 91 दिवसांत 182जीबी डेटा मिळतो. रोज 2जीबी आणि कॉलिंग व रोमिंग यात पण मोफत आहे. पण जर तुम्हाला दीर्घ वैधतेचा प्लान हवा असेल तर 1,699 रुपयांचा पॅक घेऊ शकता जो वर्षभरासाठी आहे.

जियो 4,999 रुपयांचा प्लान

हा प्लान तर अजून महाग पडतो. 360 दिवस अर्थात जवळपास वर्षभराची वैधता असणाऱ्या या प्लान साठी कंपनी ने 4,999 रुपयांची किंमत ठेवली आहे. यात यूजर्सना 350जीबी हाईस्पीड 4जी डेटा मिळतो, जो संपल्यानंतर यूजर्स 64केबीपीएस स्पीड मध्ये अनलिमिटेड डेटाचा वापर करू शकतात. याचा अर्थ असा कि तुम्हाला जवळपास रोज 1जीबी डेटा मिळेल आणि याची महिन्याची किंमत 416 रुपये पडेल. जी थोडी महाग म्हणू शकतो. हो पण चांगली गोष्ट अशी कि तुम्ही संपूर्ण डेटाचा वापर कधीही करू शकता कोणतीही कॅप नाही.

परंतु वर्षभरासाठी 1,699 रुपयांचा पॅक खूप चांगला आहे आणि डेटाची जास्त गरज असल्यास तुम्ही टॉपअप ची मदत घेऊ शकता. जवळपास अर्ध्या किंमतीती तुमचा वर्षभराचा मोबाईलचा खर्च आवरू शकतो.

जियोचा 9,999 रुपयांचा रिचार्ज

जियोचा हा प्लान सर्वात जास्त घाट्याचा सौदा आहे. या प्लानची किंमत 9,999 रुपये आहे. टॅरिफ मध्ये यूजर्सना 360 दिवसांच्या वैधतेसह 750जीबी हाई-स्पीड डेटा मिळेल. कॉलिंग व्यतिरिक्त रोमिंग सहित एसएमएस पण मोफत आहेत.

परंतु जर तुम्हाला रोज भरपूर डेटाचा हवा असेल तर तुम्ही 4जीबी डेली डेटा असलेला मंथली प्लान ज्याची किंमत 509 रुपये आहे, रिचार्ज केल्यास तो पण तुम्हाला स्वस्त पडेल. यात वर्षभरासाठी तुमचे जवळपास 6,000 रुपये खर्च होतील पण फक्त 1,344 जीबी 4जी डेटा मिळेल. नॅशनल कॉलिंग, रोमिंग आणि एसमएस यात पण मोफत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here