सॅमसंगने गेल्यावर्षी आपल्या गॅलेक्सी एफ 14 5G स्मार्टफोनला बाजारात आणले होते. तसेच, आता याचा 4 जी व्हेरिएंट Samsung Galaxy F14 लाँच झाला आहे. यात युजर्सना स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 6.7 इंचाचा मोठी स्क्रीन सारखे अनेक स्पेसिफिकेशन मिळतील. चला, पुढे सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy F14 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: कंपनीने Samsung Galaxy F14 डिव्हाईसमध्ये 6.7 इंचाचा एचडी प्लस इंफिनिटी यू एलसीडी डिस्प्ले प्रदान केला आहे. या स्क्रीनवर 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट, 391 PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट सादर करण्यात आला आहे.
- चिपसेट: हा सॅमसंग 4G मॉडेल Qualcomm Snapdragon 680 चिपसेटसह येतो. यात ग्राफिक्ससाठी कंपनीने Adreno 610 जीपीयू दिला आहे. एकूण मिळून पाहिले तर हा या किंमतीमध्ये चांगले काम करण्यासाठी तयार आहे
- स्टोरेज आणि रॅम: स्टोरेज पाहता कंपनीनं डिव्हाईसमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. याला वाढविण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉटची सुविधा पण आहे. ज्याच्या मदतीने 1TB पर्यंत मेमरीला वाढवता येते.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता कंपनीने Samsung Galaxy F14 4G मध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाईलमध्ये 13MP चा कॅमेरा आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: Samsung Galaxy F14 ला चालवण्यासाठी यात 5000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला चार्ज करण्यासाठी 25 वॉट फास्ट चार्जिंगची सपोर्ट मिळते.
- इतर: Samsung Galaxy F14 मध्ये ड्युअल नॅनो सिम, साईड माऊंटेड फिंगर प्रिंट सेन्सर, 4G VOLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 यूएसबी टाईप सी-पोर्ट सारखे अनेक फिचर्स मिळतात.
- वजन आणि डायमेंशन: Galaxy F14 4G फोनचे डायमेंशन 168 x 78 x 9mm आणि वजन 194 ग्रॅम आहे.
Samsung Galaxy F14 ची किंमत आणि उपलब्धता
- Samsung Galaxy F14 भारतात सिंगल स्टोरेज मध्ये लाँच झाला आहे. याच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेजची किंमत मात्र 8,999 रुपये आहे.
- हा मूनलाईट सिल्व्हर आणि पेपरमिंट ग्रीन सारख्या दोन कलरमध्ये सेल होईल.
- मोबाइलची सेल सॅमसंगच्या वेबसाईट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोर्सवर होईल.