शाओमी रेडमी नोट 7 प्रो मध्ये असेल क्वॉलकॉमचा सर्वात नवीन प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 675

शाओमी ने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये आपल्या नवीन सब-ब्रँड रेडमी मध्ये रेडमी नोट 7 सादर केला होता. लॉन्च इवेंट मध्ये कंपनी ने सांगितले होते कि रेडमी ब्रँड मध्ये येत्या काळात बजेट कॅटगरीचे स्मार्टफोन्स सादर केले जातील. तर कंपनी आता रेडमी नोट 7 प्रो लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी अनुसार रेडमी नोट 7 प्रो च्या मेन कॅमेऱ्यात सुधार केले जातील.

शाओमी द्वारा रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला जाणार असल्याची बातमी चीनच्या सोशल वेबसाइट वीबो वर शेअर केली गेली आहे. साइट वर या अपकमिंग फोनचे काही स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत ज्यानुसार रेडमी नोट 7 प्रो मध्ये पण 48 मेगापिक्सलचा कॅमेरा यूनिट असेल. पण यावेळी हा सोनी आईएमएक्स586 सेंसर असेल. इतकेच नव्हे तर माहितीनुसार रेडमी नोट 7 प्रो पहिला फोन असेल जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह येईल. फोनची बॅटरी आणि इतर माहिती अजूनतरी समोर आलेली नाही.

बोलले जात आहे कि स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट पेक्षा स्नॅपड्रॅगॉन 710 जास्त चांगला आणि पावरफुल असेल. रेडमी नोट 7 प्रो च्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण कंपनी आपल्या रेडमी सीरीज मध्ये बजेट कॅटगरीचे डिवाइस लॉन्च करणार असल्यामुळे याची किंमत 13,500 रुपयांच्या आसपास असेल.

अलीकडेच शाओमी ने आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत आपला पहिला स्मार्टफोन रेडमी नोट 7 लॉन्च केला होता, ज्याच्याबद्दल कंपनी ने लक्ष्य ठेवले आहे कि ते पहिल्या महिन्यात या डिवाइसचे 10 लाख यूनिट्स सेल करेल. रेडमी नोट 7 हॅन्डसेट ची खासियत म्हणजे हा 18 वॉट च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here