एक्सक्लूसिव: 12 फेब्रुवारीला लॉन्च होईल शाओमी रेडमी नोट 7, बघा ऑफिशियल इनवाइट

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतात आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करण्यास एकदम तयार दिसत आहे. याच महिन्यात चीन मध्ये शाओमी द्वारा रेडमी नोट 7 नावाने लॉन्च केला गेलेला डिवाइस आता भारतात रेडमी नोट 7 प्रो नावाने लॉन्च केला जाईल. 91मोबाईल्सला फोन लॉन्चचा मीडिया इनवाइट मिळाले आहे. पण यात स्मार्टफोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

आम्हाला या इनवाइटची माहिती मोबाईल रिटेलर्स कडून मिळाली आहे. पोस्टरनुसार हा फोन 12 फेब्रुवारीला दिल्लीत आयोजित इवेंट मध्ये लॉन्च होईल. पोस्टर मध्ये दिसत असलेली इमेज बघून हा रेडमी नोट 7 असेल असे म्हणता येईल, जो भारतात रेडमी नोट 7 प्रो नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण फरक फक्त नावातच नसेल.

कंपनी ने चीन मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी नोट 7 मध्ये सॅमसंग सेंसर वापरला होता. पण भारतात येणाऱ्या नोट 7 प्रो मध्ये सोनी आईएमएक्स586 इमेज सेंसर वाला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. शाओमी ने आपल्या सब-ब्रँड रेडमी मध्ये हा डिवाइस लॉन्च केला होता. पोस्टर बद्दल बोलायचे झाल्यास यात बॉलिवुडच्या अपकमिंग फिल्म ‘गली बॉय’ चे गाण्याचे बोल ‘अपना टाइम आएगा’ लिहिण्यात आले आहेत. कंपनी कडून रेडमी नोट 7 च्या लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही.

रेडमी नोट 7 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. शाओमी रेडमी नोट 7 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम आणि 64जीबी आणि 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरियंट सह येतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here