अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये असे अनेक स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत ज्यात 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. वीवो ने वी15 प्रो तसेच शाओमी ने रेडमी नोट 7 प्रो च्या रूपात हे स्मार्टफोन्स बाजारात आणेल आहेत. हा ट्रेंड अनुसरत टेक कपंनी ओपो ने पण आपला दाव टाकला आहे. ओपो ने भारतात आपली ‘एफ सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन एफ11 प्रो लॉन्च केला आहे. हा फोन पण 48-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्यासह येतो. एफ11 प्रो ने भारतीय बाजारातून ग्लोबल मंचावर डेब्यू केला आहे. शानदार लुक व स्टाईल सोबत एफ11 प्रो दमदार स्पेसिफिकेशन्स ने सुसज्ज आहे. चला एक नजर इंडियन स्मार्टफोन बाजारातील लेटेस्ट स्मार्टफोन ओपो एफ11 प्रो च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर टाकूया:
ओपो एफ11 प्रो ची डिजाईन
ओपो एफ11 प्रो कंपनीने फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही. फोनचे तिन्ही किनारे पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाल्याच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. ओपो एफ11 प्रो मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल जी या फोनची मोठी यूएसपी आहे. हा पॉप-अप कॅमेरा सेल्फीची कमांड देताच फोन बॉडी मधून वर येतो आणि फोटो क्लिक करतो. ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर मधोमध आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनचा बॅक पॅनल 3डी ग्रेडिएंट ग्लास फिनिश वाला आहे जो याला प्रीमियम लुक देतो.
ओपो एफ11 कॅमेरा
वर सांगितल्याप्रमाणे ओपो एफ11 प्रो चा कॅमेरा सेग्मेंटच या फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. सर्वात आधी फोनच्या रियर कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. ओपो एफ11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
या वैशिष्ट्यंसह लॉन्च झाला हुआवई वाई6 (2019), हे आहेत याचे दमदार फीचर्स
ओपो एफ11 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
ओपो एफ11 प्रो कंपनी ने 90.90 प्रतिशत स्क्रीन रेशियो वर सादर केला आहे. ओपो ने एफ11 प्रो च्या डिस्प्लेला पॅनोरॉमिक स्क्रीनचे नाव दिले आहे. हा डिस्प्ले 6.5-इंचाचा फुलएचडी+ सपोर्ट वाला आहे. एफ11 प्रो ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.
ओपो एफ11 प्रो इंडियन मार्केट मध्ये 6जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. ओपो एफ11 प्रो 4जी एलटीई आणि डुअल सिम सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्निक ने सुसज्ज 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज भारतात झाली लॉन्च, बघा सर्व मॉडेल्सची किंमत आणि कधी होईल सेल
ओपो एफ11 पण झाला लॉन्च
ओपो एफ11 प्रो सोबत कंपनीने ओपो एफ11 पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स एफ11 प्रो सारखे आहेत. ओपो एफ11 4जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
ओपो एफ11 ची किंमत व उपलब्धता
ओपो एफ11 प्रो बद्दल ओपो साउथ आशियाचे सीएमओ विल यैंग म्हणतात कि, ‘आता कंपनी आपले लक्ष्य फोनच्या रियर कॅमेऱ्यावर केंद्रित करत आहे आणि स्मार्टफोन्स मध्ये लो लाईट फोटोग्राफीची विशेष काळजी घेतली जाईल. इंडियन मार्केट मधून ग्लोबल मंचावर डेब्यू करणारा ओपो एफ11 प्रो कंपनी द्वारा 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तर ओपो एफ11 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही फोन 15 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होतील.


















