नोकिया ब्रांड चे 4 नवीन स्मार्टफोन मागच्या महिन्यात एचएमडी ग्लोबल ने भारतात लॉन्च केले आहेत. कंपनी ने नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस, न्यू नोकिया 6 आणि नोकिया 1 भारतीय बाजारात आणले होते. या स्मार्टफोंस मधील न्यू नोकिया 6 कंपनी ने 16,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला होता, ज्यात 3जीबी रॅम होती. तसे पाहता हा फोन 6 एप्रिल पासून सेल साठी उपलब्ध झाला होता पण नोकिया फॅन्स साठी नवीन भेट म्हणून कंपनी ने या फोन चा 4जीबी रॅम वेरिएंट पण लॉन्च केला आहे.
न्यू नोकिया 6 च्या या नवीन वेरिएंट मध्ये 4जीबी ची रॅम मेमरी आणि 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या नवीन वेरिएंट ची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. न्यू नोकिया 6 च्या हा वेरिएंट ब्लू गोल्ड ह्यू कलर मध्ये आगामी 13 मे पासून शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरून विकत घेता येईल. लॉन्च आॅफर म्हणून या फोन सोबत एयरटेल यूजर्सना कंपनी कडून 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. तसेच फोनच्या खरेदीवर 25 टक्क्यांचा एमएमटी डिस्काउंट वाउचर पण मिळत आहे.
न्यू नोकिया 6 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा 6000 सीरीज एल्युमिनियम बॉडी वर सादर करण्यात आला आहे जो याला आर्कषक आणि मजबूत बनवतो. या फोन मध्ये 1920 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा फुलएचडी डिसप्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.
न्यू नोकिया 6 भारतात एंडरॉयड वन आधारित 8.0 ओरियो वर सादर करण्यात आला आहे, त्याचबरोबर हा 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 508 जीपीयू आहे. सध्यातरी भारतात हा 3जीबी रॅम मेमरी व 32जीबी ची इंटरनल स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे जी 128जीबी ची एक्सपेंडेबल स्टोरेज आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर नोकिया च्या या फोन च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरा मध्ये कार्ल जेसिस लेंस चा वापर करण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर न्यू नोकिया 6 च्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.
न्यू नोकिया 6 मध्ये सिक्योरिट साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. यात 4जी वोएलटीई व यूएसबी टाईप-सी पोर्ट सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
















