32MP Selfie, 108MP Rear कॅमेरा आणि 100W Charging सह Infinix Note 40 Pro 5G सीरिज भारतात लाँच

इनफिनिक्सने आपल्या नवीन नोट सीरिजला भारतात सादर केले आहे. कंपनीकडून Infinix Note 40 Pro 5G आणि Infinix Note 40 Pro+ 5G फोन भारतात लाँच केला आहे, जो स्टायलिश लूक व शानदार स्पेसिफिकेशनसह आला आहे. 32MP Selfie Camera, 108MP Rear Camera, 100W Charging आणि MediaTek Dimensity 7020 प्रोसेसरच्या ताकदीसह या दोन्ही इनफिनिक्स फोनची फुल माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Infinix Note 40 Pro 5G आणि Pro+ 5G ची किंमत

Infinix Note 40 Pro 5G किंमत

इनफिनिक्स नोट 40 प्रो 5 जी फोन 8GB RAM + 256GB Storage सह भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. सुरुवाती सेलमध्ये कंपनी आपल्या डिव्हाईसवर 2,000 रुपयांची सूट देत आहे ज्याला शॉपिंग साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. हा इनफिनिक्स फोन Vintage Green आणि Cityscape Golden कलरमध्ये येऊ शकतो.

Infinix Note 40 Pro+ 5G ची किंमत

इनफिनिक्स नोट 40 प्रो प्लस 5 जी फोन 12GB RAM + 256GB Storage वर लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये आहे. हा मोबाईल Vintage Green आणि Obsidian Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल ज्याला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

Infinix Note 40 Pro 5G आणि Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.78″ Curved AMOLED Display
  • MediaTek Dimensity 7020
  • 108MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 100W Fast Charging (Pro+)
  • 4,600mAh Battery (Pro+)
  • 45W Fast Charging (Pro)
  • 5,000mAh Battery (Pro)
  • 20W Wireless Charging

डिझाईन आणि डिस्प्ले आहे दमदार

डिस्प्ले : इनफिनिक्स नोट 40 प्रो आणि नोट 40 प्रो+ स्मार्टफोन 1080 x 2436 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही कर्व्ड अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2160 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग तसेच 1300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते.

डिझाईन : फोनच्या बॅक पॅनलवर Halo Lighting देण्यात आली आहे जी नोटिफिकेशन आल्यावर चमकते. हा फोन IP53 रेटिंगसह आला आहे जो याचे पाण्यापासून संरक्षण करते. फोनला Corning Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन प्राप्त आहे. या दोन्ही मोबाईल फोनचे डायमेंशन 164.28×74.5×8.09 एमएम आहे.

प्रोसेसरची पावर करेल इम्प्रेस

प्रोसेसर : नवीन इनफिनिक्स नोट 40 प्रो 5 जी सीरिजचे दोन्ही मोबाईल फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 7020 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाले आहेत. ही 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 2.2 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालते.

ओएस : Infinix Note 40 Pro 5G आणि Note 40 Pro+ 5G स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाले आहेत जो एक्सओएस 14 वर काम करतो. कंपनीने आपल्या डिव्हाईसला 2 वर्षाच्या अँड्रॉईड ओएस अपडेट तसेच 3 वर्षाच्या सिक्योरिटी अपडेटसह मार्केटमध्ये आणले आहे.

कॅमेराची क्वॉलिटी पण पाहा

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स नोट 40 प्रो सीरिज ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह चालतो. त्याचबरोबर रिअर कॅमेरा सेटटपमध्ये 2 मेगापिक्सलचे दोन इतर लेन्स पण आहेत.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Infinix Note 40 Pro 5G आणि Note 40 Pro+ 5G फोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे फोन Dual Video फिचरसह आहेत तसेच यामध्ये अनेक आर्कषक फिचर्स व मोड्स पण मिळतात.

दमदार बॅटरीसह अ‍ॅडव्हान्स तंत्रज्ञानाने सुसज्ज

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Infinix Note 40 Pro 5G फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे तसेच Infinix Note 40 Pro+ 5G फोन 4,600 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की फोनची बॅटरी 3 वर्षापेक्षा जास्त हेल्थ लाईफसह येतो.

चार्जिंग : मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी इनफिनिक्स नोट 40 प्रो स्मार्टफोनमध्ये 45 वॉट फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे तसेच इनफिनिक्स नोट 40 प्रो+ 100 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करतो. हे दोन्ही मोबाईल फोन 20 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here