Huawei चा सब ब्रँड Honor लवकरच आपली Honor 20 सीरीज लॉन्च करणार आहे, ज्यासाठी कंपनी ने 21 मे ला लंडन मध्ये एका इवेंटचे आयोजन केले आहे. कंपनीने लॉन्चिंग साठी ऑफिशल मीडिया इनवाइट्स पाठवले आहेत. तसेच या सीरीज मध्ये Honor 20i स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
किंमत
Honor 20i च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 16,590 रुपये) आहे. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 16,590 रुपये) आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 1,899 युआन (जवळपास 19,700 रुपये) आहे. तसेच फोनच्या 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत (जवळपास 22,800 रुपये) आहे. चीन मध्ये Honor 20i स्मार्टफोन चा प्री-सेल 18 एप्रिल म्हणजे उद्या सुरु होईल.
Honor 20i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
स्पेसिफिकेशन पाहता यात 6.21-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर किरिन 710 प्रोसेसर दिला जाईल. याचे तीन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत. सोबतच यात 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज आहे.
हे देखील वाचा: TikTok ला धक्का, गूगल प्लेस्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर ने काढून टाकला हा ऍप
फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ वर्जन 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे Honor ने सोमवारी घोषणा केली आहे कि कंपनी हॉनर 20 सीरीज 21 मे ला सादर करेल. Honor 20i व्यतिरिक्त लंडन मध्ये आयोजित इवेंट मध्ये Honor 20, Honor 20 Pro आणि Honor 20A लॉन्च केले जाऊ शकतात. पण कंपनी ने सध्यातरी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
















