165 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळतो Nokia 6310 Mobile; सिंगल चार्जवर 35 दिवस चालेल याची बॅटरी

HMD Global नं काही वर्षांपूर्वी Nokia ब्रँडचं लायसन्स मिळवलं होतं. तेव्हापासून कंपनी क्लासिक नोकिया फीचर फोन्स नव्या अवतारात लाँच करत आहे. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी आपला लोकप्रिय क्लासिक Nokia 6310 मॉडर्न फीचर्ससह सादर केला होता. हा नवीन एलिगेंट परंतु ओळखीच्या बॉडीसह बाजारात आला आहे. जर तुम्ही एक फीचर फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आजही नोकियापेक्षा चांगला ऑप्शन सापडत नाही.

कंपनी मोठ्या बॅटरी बॅकअपसह मजबूत बॉडी असलेले फोन्स सादर करते. त्यामुळे नोकिया फोन्स दीर्घकाळ टिकतात. आज देखील फीचर फोन बाजारात नोकिया फोन्सची बरोबरी करणं कठीण आहे. त्याचप्रमाणे नवीन Nokia 6310 देखील शानदार आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे फिचर फोन असून देखील नोकिया हा फोन फोन नो कोस्ट ईएमआयवर विकत घेता येईल आणि ते देखील 200 रुपयांपेक्षा कमीच्या हप्त्यावर. पुढे आम्ही तुम्हाला या फोनच्या ईएमआय प्लॅनसह फोनच्या फीचर्स आणि स्पेसिकेशन्सची माहिती दिली आहे.

165 रुपयांमध्ये खरेदी करा Nokia 6310

Nokia 6310 keypad Phone बद्दल बोलायचे तर हा हँडसेट ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर एक्सेचेंज डिस्काउंट व्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन पे लेटरद्वारे No Cost EMI वर विकत घेण्याचा ऑप्शन दिला जात आहे. तसेच, जर तुम्ही फोन American Express Credit Card नं विकत घेतला तर 12 महीने तुम्हाला 165 रूपांचा ईएमआय द्यावा लागेल. परंतु यात वर्षभरासाठी ग्राहकांकडून 518 रुपयांचा व्याज घेतला जाईल. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 3917 रुपये द्यावे लागतील. कंपनी या फोनवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत लाँच झाला नोकियाचा 5G Phone; जाणून च्या Nokia G400 चे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस

इथं पाहा कोणत्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर किती EMI द्यावा लागेल

Nokia 6310 चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 6310 मध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये UNISOC 6531F प्रोसेसर, 8MB रॅम आणि 16MB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा फोन Series 30+ (S30+) ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. नोकिया 6310 मध्ये 0.3 मेगापिक्सल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो आणि युजर्स 32 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात. हँडसेटमध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, ड्यूल-सिम सपोर्ट आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स आहेत. हे देखील वाचा: फोनच्या मागेच फिट होतात TWS Earbuds; हटके Nokia 5710 XpressAudio देतो 31 दिवसांचा बॅकअप

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 1150mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे जी 2001 मध्ये आलेल्या मॉडेलपेक्षा थोडी मोठी आहे. परंतु नोकियाचा दावा आहे की तुम्हाला 7 तासांपेक्षा जास्त टॉकटाइम मिळेल आणि 35 दिवसांपर्यंत स्टॅन्डबाय टाइम मिळेल. बॅटरी फोनमधून काढता येते. फोनसह बॉक्समध्ये चार्जर आणि मायक्रो-यूएसबी केबल मिळते. नोकिया 6310 ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि यलो या चार कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. फोनची विक्री अ‍ॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या साइट व्यतिरिक्त ऑफलाइन स्टोरवर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here