ट्रांजिशन होल्डिंग्स सब-ब्रँड Infinix यावर्षी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. कंपनी ने सोशल मीडिया वर पोस्ट करून असे सांगितले आहे. तसेच अपकमिंग फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर लिस्ट आहे. फ्लिपकार्ट वर डिवाइस मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा टीज करण्यात आला आहे.
91मोबाईल्सला एका सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि या कंपनीचा स्मार्टफोन 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाईल. जर असे झाले तर Infinix चा स्मार्टफोन मार्केट मधील सर्व स्मार्टफोन पेक्षा स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन ठरेल. सध्या भारतीय मार्केट मध्ये TECNO Camon i4 स्मार्टफोनच्या नावे सर्वात कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा ताजा आहे. या डिवाइसची किंमत 9,599 रुपयांपासून सुरु होते.
हे देखील वाचा: 32एमपी सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह आला Honor 20i, फीचर्स पाहून व्हाल हैराण
फ्लिपकार्टच्या लिस्टिंग बद्दल बोलायचे तर यात इनफिनिक्स द्वारा सादर होणारा हँडसेट ट्रिपल रियर कॅमेरा आणि बेजल लेस डिस्प्ले व वॉटर ड्रॉप नॉच सह सादर केला जाईल. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा व ईयरपीस असेल. टीजर मध्ये स्मार्टफोनचे फोटोग्राफी स्कील्स टीज करण्यात आले आहेत. तसेच 91mobiles ला समजले आहे कि फोनची साइज 6-इंचापेक्षा मोठी असेल. तसेच फोन फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.
Infinix Note 5 Stylus गेल्यावर्षी कंपनी द्वारा सादर करण्यात आलेला शेवटचा फोन होता. हा फोन कंपनी ने एंडरॉयड वन आणि एक्सपेन सह सादर केला होता. हा हँडसेट कंपनी ने 15,999 रुपयांच्या सुरवाती किंमतीत लॉन्च केला होता. फोन मध्ये 5.93-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आणि मीडियाटेक 2गीगार्ट्ज हेलियो पी23 चिपसेट होता. सोबत डिवाइस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली होती, जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी 16-मेगापिक्सल सेंसर फ्रंट आणि मागे आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे.














